सोयाबीन

सोयाबीनवरील केवडा

Peronospora manshurica

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानाच्या वरच्या पृष्ठभागावर बारीक, फिकट ठिपके येतात.
  • जुने डाग ठळक प्रभावळीसह तपकिरी होतात.
  • पानाचा खालचा भागावर बारीक राखाडी लव आढळते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

कोवळ्या रोपांवर या रोगाच्या सुरुवातीची लक्षणे आढळतात पण झाडाची संपूर्ण वाढ होईपर्यंत किंवा उत्पादकतेच्या सुरवातीच्या टप्प्यापर्यंत तरी रोग वाढत नाही. सुरवातीला बारीक, अनियमित, फिकट पिवळे ठिपके पानांच्या वरच्या पृष्ठभागावर दिसतात. नंतर ते पिवळ्या कडांसह राखाडी तपकिरी होतात. पानांच्या खालच्या बाजुला जंतुंच्या उपस्थितीमुळे बारीक राखाडी लव असलेले ठिपके आढळतात. लक्षणे शक्यतो झाडाच्या खालच्या बाजूला आढळतात. जर शेंगा संक्रमित झाल्या तर शेंगाच्या आत खपलीसारखी बुरशीची वाढ दिसते. संक्रमित बिया निस्तेझ पांढर्‍या दिसतात आणि अर्ध्या किंवा पूर्णपणे बुरशीच्या खपलीने भरलेल्या असतात. पानाच्या वयावर डांगांचे माप आणि आकार अवलंबुन असतो. जुने डाग पिवळ्या किंवा हिरव्या कडांसकट तपकिरी ते गडद तपकिरी होतात आणी अकाली गळतात

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत आम्हाला या रोगाविरूद्ध कोणत्याही जैविक नियंत्रण पद्धतीची माहिती नाही. आपणास या रोगाची घटना किंवा लक्षणांची तीव्रता कमी करण्याची कोणतीही यशस्वी पद्धत माहित असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेटालॅक्झिल, ऑक्साडिक्झिल सारख्या बुरशीनाशकांसह मँकोझेब, मॅनेब किंवा झायनेब वापरुन बीजोपचार करा.

कशामुळे झाले

बुरशीसदृष जीवाणू पेरोनोस्पोरा मॅनशुरिका मुळे हे रोग उद्भवते. हे जीवाणू शेतातील पानांच्या कचर्‍यात जाड आवरणाचे विश्रांती घेणारे बीजाणू म्हणुन आणि क्वचित बियाण्यात जगतात. फुलधारणा झाल्यानंतर हा रोग होणे सर्वसामान्य आहे. कोवळी पाने सर्वात जास्त संवेदनशील असतात आणि झाडाच्या शेंड्याकडील पाने बहुधा संक्रमित झालेली दिसतात. सोयाबीनच्या प्रौढ झाडावरील डाग संख्येने वाढतात आणि जुन्या पानावरील डाग आकाराने कमी होतात. मध्यम तापमान (२०-२२ अंश) आणि जास्त आर्द्रता रोगास अनुकूल आहे. बुरशी शेतातील पानांच्या कचर्‍यात आणि बियाणावर जाड आवरणाचे बीजाणू (सूप्त बीजाणू)च्या रुपात विश्रांती घेते. या रोगाचे विकसन बहुधा हवामानावर अवलंबुन आहे. जेव्हा आर्द्रता कमी होते तेव्हा या बुरशी जंतुंना त्रास होतो आणि भविष्यातील रोगाचा प्रसार टाळला जातो. आर्द्रता जास्त झाल्यास आणि संततधार पडणार्‍या पावसात केवडा बुरशी विकसित होत रहाते.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीसाठी उपलब्ध असलेले प्रमाणित प्रतिकारक बियाणे वापरा.
  • दाट लागवड किंवा जास्त खते देणे टाळा.
  • किमान एक वर्षासाठी तरी सोयाबीनचा इतर यजमान नसणार्‍या पिकांसह पीक फेरपालट केल्यास केवडा रोगाची घटना कमी होऊ शकतात.
  • पुढील वर्षात हे रोग होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी संक्रमित पिकाचे अवशेष गाडून टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा