भात

भातावरील दांडा करपा

Alternaria padwickii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • गडद तपकिरी कडांचे गोलाकार ते लंबगोलाकार ठिपके येतात.
  • दाणे आक्रसलेले आणि ठिसुळ होतात.
  • संपूर्ण रोप करपा व मर चे लक्षण दर्शविते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पानांवर आणि पक्व होणार्‍या दाण्यांवर लक्षणे दिसतात. मुळांवर किंवा सुरुवातीला येणार्‍या पानांवर बारीक गडद डाग दिसतात. डागांच्या वरील रोपाचा भाग करपतो आणि वाळतो. पानांवर गडद तपकिरी कडांचे गोलाकार ते लंबगोलाकार (३-१० मि.मी. व्यासाचे) डाग येतात. या मोठ्या डागाच्या मध्यभागी बहुधा तपकिरी किंवा पांढरे ठिपके दिसतात. साळी आक्रसलेली आणि ठिसुळ होते. संक्रमित दाणे बहुधा गडद रंगाचे, खडुसारखे, ठिसुळ आणि आक्रसलेले असतात तसेच उगवण क्षमता कमी भरते. पर्णकोषावर लालसर तपकिरी ठिपके उमटतात. साळी आक्रसलेली आणि ठिसुळ असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

थायरम, कॅप्टन किंवा मँकोझेब २ ग्रा. / किलो चे बीजोपचार करा. उगवण क्षमता वाढवण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी बियाणांवर ५४ अंश गरम पाण्याचे उपचार १५ मिनिटे करा. भाताचे धसकट व तनीस शेतात जाळा. रोपांच्या सभोवताली बुरशीची वाढ नियंत्रित करण्यासाठी स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्स जिवाणूंची पावडर ५ ते १० ग्राम प्रति किलो याप्रमाणे वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरोथॅलोनिल, मँकोझेब, कार्बॉक्सिन, पॉलिऑक्सिन आणि आयप्रोबेनफॉस बुरशीनाशकांच्या फवारण्या दाण्यांच्या रंगहीनतेच्या नियंत्रणासाठी करा.

कशामुळे झाले

हा रोग टी.पॅडविकि या बियाणेजन्य बुरशी, एक अलैंगिक-पुनरुत्पादक बुरशी, जी भाताच्या दाण्यांना संक्रमित करते. हे बियाणे रंगहीनता, धान्य कुज व रोपात करपा निर्माण करते. हिच्या घटना प्रामुख्याने उष्णकटिबंधीय भागात नोंदविलेल्या आहेत. आर्द्रता आणि उच्च तापमान बुरशीच्या वाढीस अनुरुप आहेत. बुरशी स्क्लेरोशिया म्हणुन रोपांच्या अवशेषात आणि जमिनीत रहाते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगमुक्त बियाणे लावा.
  • ओळींमध्ये (१५,२० आणि २५ सें.मी.
  • रुंदीच) अंतर राखा.
  • हे बियाणेजन्य जंतु नविन भागात येण्यापासुन आणि आधीच संक्रमित भागात संक्रमण वाढण्याचा प्रतिबंध करण्यासाठी फक्त प्रमाणित आणि चाचणी केलेलेच बियाणेच वापरा.
  • पुढच्या हंगामातील संक्रमण कमी करण्यासाठी भाताचे धसकट जाळा.
  • साठवणीत होणारे संक्रमण टाळण्यासाठी साठवणीपूर्वी धान्य योग्यरीत्या वाळवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा