कापूस

कपशीवरील ओला करपा

Ascochyta gossypii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फिकट डाग अंकुरलेल्या रोपांच्या खालच्या पानांवर किंवा कपासारख्या खोलगट भागात येतात.
  • पानांवर गव्हाळी डागांना गडद तपकिरी किनार असते.
  • फांद्यांवर लांबट काळे किंवा राखाडी कँकर्स येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

अॅस्कोचिता करपा हा मोसमात खास करुन लवकर होतो. ह्याची वैशिष्ट्ये आहेत, गोल, फिकट तपकिरी किंवा पांढरे, विविध मापाचे डाग कपासारख्या खोलगट भागात आणि रोपाच्या खालील पानांवर येतात. हे डाग चांगलेच मोठे होतात आणि त्यांना जांभळट-तपकिरी किनार असते. नंतर संक्रमणात पक्व पानांवर गडद तपकिरी किनारीसहही गव्हाळ डाग येतात. डाग मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि मोठा गव्हाळ धब्बा निर्माण करतात. ह्या डागांचे केंद्र फिकट तपकिरी किंवा राखाडी आणि कागदासारखे पापुद्र्याचे होते जे अखेरीस गळते. मुख्यत: जर लागोपाठ ढगाळ, ओलसर हवा राहीली तर लांबट, काळे किंवा राखाडी कँकर्स फांद्यांवरही येतात. कालांतराने कँकर्सही सुकतात, चिरा जातात आणि फांदीला वेढतात, ज्यामुळे रोपाचे सुदूर भाग मरतात. फुलांवर हल्ला होत नाही पण बोंडे अर्धवट उघडतात आणि आतील सरकी राखाडी रंगहीन असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत ह्या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. बोरॅडॉक्स मिश्रणासारखी कॉपरवर आधारीत बुरशीनाशके रोगाचा प्रसार सीमित करतात. लक्षात घ्या कि ह्यामुळे रोपात विषारी प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थिराम किंवा थिराम + थियाबेनडाझोलचे उपचार बियाणांवर पेरणीपूर्वी केले जाऊ शकतात. झाडीवर क्लोरोथॅलोनिलवर आधारीत प्रतिबंधक बुरशीनाशकांचे फवारे वापरले जाऊ शकतात खास करुन जेव्हा संवेदनशील वाणाची लागवड केलेली असेल. रोग दिसताक्षणीच झाडीवरील बुरशीनाशके (बॉस्कॅलिड, मँकोझेब, पायराक्लोस्ट्रोबिन + फ्ल्युक्सापायरोक्सॅड) सिस्टेमिक प्रकारे आलटुन पालटुन वापराची शिफारस करण्यात येते. उत्पन्नाचे गंभीर नुकसान टाळण्यासाठी वाढीच्या पूर्ण मोसमभर उपचारांची गरज भासु शकते.

कशामुळे झाले

अॅस्कोचिता करपा हा कापुस लागवडीच्या बहुतेक भागात सापडतो आणि अॅस्कोचिता गॉसिपि बुरशीमुळे उद्भवतो. ही बुरशी रोपांच्या अवशेषात पुष्कळ वर्षांपर्यंत जगते आणि अनुकूल परिस्थितीत बीजाणू तयार करते ज्यांचा प्रसार नंतर वार्‍याने आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने होतो जो काही वेळा पुष्कळ किलोमीटर अंतरापर्यंत पोचतो. थंड, ढगाळ आणि पावसाळी वातावरण, जास्त आर्द्रता, सकाळचे दव आणि पाने जास्त काळ ओली रहाणे (२ तास किंवा जास्त) असल्यास ह्या रोगाच्या प्रसारास अनुकूल असते. बुरशीची वाढ तापमानाच्या मोठ्या फरकात (५-३० अंश) होते पण कमाल वाढ मात्र १५-२५ अंशात होते. जर परिस्थिती अनुकूल असेल तर संक्रमणाची पुष्कळशी चक्रे वाढीच्या मोसमात होऊ शकतात. उत्पन्नाचे नुकसान क्वचितच होते पण अनुकूल परिस्थिति असल्यास शक्य अाहे.


प्रतिबंधक उपाय

  • जर उपलब्ध असली तर जास्त लवचिक वाण वापरा.
  • प्रमाणित रोगमुक्त बियाणांचे सामान वापरा.
  • किंवा निरोगी शेतातुन धरलेले बियाणे वापरा.
  • झाडी जास्त दाट होऊ नये म्हणुन बियाणांच्या दरांच्या शिफारशीचे पालन करा.
  • रोगांचे अतिवाईट परिणाम टाळण्यासाठी उशीरा लागवड करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने रोगट रोपे, स्वयंभु रोपे आणि तण काढुन टाका.
  • शेतीत स्वच्छता सवयी जसे कि धुण्याच्या जागा, कपडे आणि सफाईची साधने बाळगा.
  • जास्त पाणी देणे टाळा आणि फवारा सिंचन टाळा.
  • पानांचे पृष्ठभाग ओले असताना शेतात काम करणे टाळा.
  • उत्पन्नाचे नुकसान होऊ नये म्हणुन शक्य तितक्या लवकर काढणी करा.
  • रोपांचे अवशेष शेतात खोल गाडा म्हणजे बुरशी पुडच्या मोसमात परत ऊगवणे कमी होईल.
  • किंवा काढुन जाळुन नष्ट करा.
  • २-३ वर्षांसाठी संवेदनशील नसलेल्या रोपांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा