मका

पान आणि पर्णकोषावर पट्टे देणारा करपा

Rhizoctonia solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाणी शोषल्यासारखे, रंगहीन केंद्रीत पट्टे आणि वर्तुळे पानांवर आणि पर्णकोषांवर दिसतात.
  • फिकट तपकिरी कापसासारखी मायसेलियम बुरशी संक्रमित भागांवर विकसित होते आणि नंतर कणसावर पसरते.
  • एका अठवड्यात पूर्ण रोपच भाजल्यासारखे दिसते.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

बहुधा रोग ४०-५० दिवसांच्या रोपांवर होतो पण कोवळ्या रोपांवर देखील होऊ शकतो. पान, पर्णकोष आणि खोडांवर लक्षणे विकसित होतात आणि नंतर कणसांपर्यंत पसरतात. पान आणि पर्णकोषांवर अनेक पाणी शोषलेले, रंगहीन, बहुधा तपकिरी, गव्हाळ किंवा राखाडी रंगाचे केंद्रीत पट्टे किंवा वर्तुळे दिसतात. सामान्यपणे लक्षणे सुरवातीला जमिनीवरील पहिल्या आणि दुसर्‍या पर्णकोषावर उमटतात. कालांतराने विशिष्ट फिकट तपकिरी कापसासारखी वाढ, बारीक गोल, काळ्या ठिपक्यांसकट संक्रमित भागात विकसित होते आणि नंतर कणसांपर्यंत पसरते. विकसित होणारी कणसे पूर्णपणे खराब होतात आणि अकालीच सुकुन कूस पाने बाहेर येतात. कणसाच्या वाढीच्या कोणत्या टप्प्यावर संक्रमण झाले यावर रोगाची गंभीरताअवलंबुन असते. जर कोवळ्या रोपाला लागण झाली तर शेंडे वाळतात आणि संपूर्ण रोप एका अठवड्यात करपल्यासारखे दिसते.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोगाची घटना आणि गंभीरता कमी करण्यासाठी मक्याच्या बियाणांना १० मिनीटे १% सोडियम हायपोक्लोराइट द्रावणात आणि ५% इथॅनॉलमध्ये निर्जंतुक करुन, तीन वेळा पाण्याने धुवुन वाळवावे. बॅसिलस सबटिलिस असणार्‍या द्रावणांचे अतिरिक्त उपचार केल्यास परिणाम जास्त मिळतील. ट्रायकोडर्मा हार्झियानम किंवा टी. व्हिरिडी बुरशी असणारे उत्पादही वापरुन रोगाचा प्रसार सीमित केला गेला आहे. प्रतिजैविक व्हॅलिडामायसिनसुद्धा चांगले नियंत्रण देते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मक्याच्या बियाणांवर कप्तान, थिराम किंवा मेटालॅक्झिल तीन वेळा निर्जंतुक केलेल्या पाण्याने धुवुन वार्‍याने सुकवुन उपचार केले जाऊ शकतात. जर संवेदनशील वाणाची लागवड केली असली आणि हवामान परिस्थिती रोगाच्या गंभीरतेला अनुकूल असल्यास बुरशीनाशकांचे फवारे आर्थिकरीत्या परवडणारे आहेत. प्रॉपिकोनाझोल असणारे उत्पाद वाईट लक्षणे टाळण्यासाठी परिणामकारक आहेत.

कशामुळे झाले

र्ह्य‍िझोक्टोनिया सोलानी नावाच्या जमिनीत रहाणार्‍या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी जमिनीत किंवा संक्रमित रोपांच्या अवशेषात किंवा गवती तणात रहाते. अनुकूल आर्द्रता आणि तापमान (१५ ते ३५ डिग्री सेल्शियस) वाढीच्या सुरवातीला असल्यास बुरशीची वाढ सुरु होते आणि नविनच लागवड केलेल्या यजमान पिकांना लक्ष्य करते. ७०% सापेक्ष आर्द्रता असल्यास रोगाची वाढ फारच कमी असते /नसते, पण ९०-१००% सापेक्ष आर्द्रता असल्यास रोगाची कमाल वाढ होते. बुरशीचा प्रसार सिंचनाच्या पाण्याने, पाणी भरल्याने आणि संक्रमित माती हत्यारांवर किंवा कपड्यांवर राहील्याने होतो. ऊष्णकटिबंधातील आणि समशीतोष्णकटिबंधातील आर्द्र आणि ऊष्ण हवेत, हा रोग जास्त दिसतो. ह्याचे नियंत्रण बुरशीनाशकांद्वारे करणे फारच कठिण आहे आणि म्हणुन व्यवस्थापनांच्या सवयींना संयुक्तपणे वापरण्याचीच बहुधा गरज भासते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • दाट लागवड टाळा.
  • काढणीनंतर संक्रमित रोपांचे अवशेष काढुन जाळुन टाका.
  • रोपांना इजा होऊ देऊ नका आणि शेत स्वच्छ ठेवा.
  • जमिनीला स्पर्श करणारी संक्रमित पाने त्यांच्या पर्णकोषांसह काढुन टाका.
  • पीक फेरपालट केल्याने देखील या रोगाचा प्रसार कमी करण्यात काही प्रमाणात मदत मिळते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा