कांदा

कांद्याच्या पातीवरील स्टेमफिलियम करपा

Pleospora allii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर बारीक, पाणी शोषल्यासारखे, पांढरट ते फिकट पिवळे ठिपके येतात.
  • कालांतराने गव्हाळ ते तपकिरी केंद्राचे खोलगट, लांबट, तपकिरी धब्बे येतात.
  • मोठे सुकल्याल्या भागामुळे पेशी करपतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
लसुण
कांदा

कांदा

लक्षणे

लवकर दिसणार्‍या लक्षणात पानांवर बारीक, पाणी शोषलेले, पांढरट ते फिकट पिवळे ठिपके येतात. विशेष म्हणजे हे डाग मोठ्या संख्येने वार्‍याच्या वाहत्या दिशेने तोंड करुन असणार्‍या पानांच्या बाजुला दिसतात. कालांतराने हे छोटे डाग पानाच्या पात्याबरोबर वाढतात आणि एकमेकात मिसळुन गव्हाळ ते तपकिरी केंद्राचे खोलगट, अंडाकृती आकाराचे किंवा लंबगोलाकार, तपकिरी धब्ब्यात बदलतात. ह्यांच्या केंद्रात एकात्मिक क्षेत्रही विकसित होऊ शकते. फार पुढच्या टप्प्यांवर, मोठे सुकलेले भाग तयार होतात, हे पानांस किंवा कांद्याच्या खोडाला वेढतात ज्यामुळे पेशी खूप करपतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

अॅझाडिराक्टा इंडिका (नीम) आणि धतुरा स्टामोनियम (जिमसोनवीड) चा द्रव अर्क वापर, पानांवरील स्टेमफिलियम करपा रोगासाठी, पारंपारिक बुरशीनाशकांच्या प्रभावाइतकाच प्रभाव देतो. हरितगृहाच्या परिस्थितीत, ट्रिकोडर्मा हरझियानम आणि स्टाचिबोट्रिस चारटारमवर आधारीत उत्पादांच्या प्रतिबंधक किंवा उपचारात्मक वापराने रोगाच्या घटना आणि गंभीरता (दोन्ही बाबतीत सुमारे ७०%) कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनोकोनाझोल, बॉस्कालिड + पायराक्लोस्ट्रोबिन, क्लोरोथॅलोनिल, आयप्रोडियॉन, मँकोझेव आणि प्रोक्लोराझ सारखे सक्रिय घटक असणारी द्रावणे, एस. वेसिकॅरियमच्या वाढीला कमी करण्यात परिणामकारक असतात. जेव्हा बुरशीला प्रतिकूल हवामान (थंड आणि कोरडे हवामान) असते तेव्हाच उपचार करावेत. एकुणच बुरशीनाशकांचा वापर विविध वेळी विविध उत्पाद वापरुन केला तर जास्त परिणामकारक असतो.

कशामुळे झाले

प्लयोस्पोरा अॅलि नावाच्या बुरशीमुळे पानांवर स्टेमफिलियम करपा होतो, ज्याला पूर्वी स्टेमफिलियम व्हेसिकॅरियम म्हटले जायचे, म्हणुन रोगाचे हे नाव आहे. संक्रमित रोपांच्या अवशेषांत हे विश्रांती घेतात आणि वसंत ऋतुत अनुकूल हवामान असल्यानंतर परत वाढ सुरु होते. हे सहसा कांद्याच्या पात्यांचे टोक, पूर्वीच्या रोगांचे व्रण किंवा (किड्यांनी केलेल्या किंवा गारपीटीच्या) जखमा यासारख्या मृत आणि मरत असलेल्या भागांत शिरतात. ऊबदार ओल्या परिस्थितीत रोगाचा विकास चांगला होतो. जर हवामान ऊबदार (१८-२५ अंश) आणि पाने २४ तासांपेक्षा जास्त काळ ओली राहिली तर निरोगी पानांवरही हल्ला होऊ शकतो. संक्रमण बहुधा पानातच सीमित रहाते आणि कंदाला प्रभावित करीत नाही. जुनी पाने नव्या पानांपेक्षा जास्त संवेदनशील असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण (अनेक उपब्ध आहेत).
  • पाने जास्त काऴ ओली राहू नयेत म्हणुन वार्‍याच्या वाहत्या दिशेने लागवड करा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी रोपांची दाटी कमी करा.
  • लागवडीपूर्वी शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होत असण्याची काळजी घ्या.
  • झाडीची दाटी कमी करण्यासाठी नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळा.
  • काढणीनंतर रोपांचा कचरा काढुन अवशेष गाडा.
  • ३-४ वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा