इतर

मुळे आणि बुड कुज

Cochliobolus sativus

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • गडद तपकिरी भाग खोडाच्या बुडाशी आणि मुळांवर दिसतात.
  • लांबट तपकिरी काळे डाग (स्पॉट ब्लॉच) खालील पानांवर दिसतात.
  • नंतरच्या टप्प्यांवर एक किंवा जास्त ओंब्या किंवा पूर्ण कणिसच अकाली ब्लीच केल्यासारखे दिसते.
  • क्लोरोटिक (पिवळे) वाढ खुंटलेली रोपे शेतात अधुनमधुन किंवा अनियमित भाग शेतात दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

हवामान परिस्थितीवर आणि रोपाच्या वाढीच्या टप्प्यावर लक्षणे अवलंबुन आहेत. काही वेळा दूषित बियाणांतुन अंकुरलेली रोपे करपतात, ज्याचे वैशिष्ट्य असते कोवळ्या रोपांवर गडद तपकिरी भाग येणे. पक्व रोपांना लवकर झालेला संसर्ग कदाचित लक्षणे दर्शविणारही नाही, फक्त झाडी आणि फांद्या कमी होतील. तरीपण, गडद तपकिरी भाग खोडाच्या बुडाशी किंवा जमिनीखाली आणि पेरांमध्ये आणि मुळांमध्ये दिसतात. नंतर जसे जंतु खोडात पोचतात तेव्हा लांबट तपकिरी काळेडाग खालच्या पानांवर दिसतात. सतत पडणारा पाऊस काही काळ राहीला तर ही लक्षणे स्पष्ट दिसतात. रोगी रोपे एकेकटी किंवा त्यांचे भाग शेतात दिसतात, त्यांची वाढ खुंटलेली आसते आणि बहुधा पिवळी असतात. उशीरा झालेल्या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत एका किंवा जास्त ओंब्या किंवा पूर्ण कणिस अकाली पिवळे पडते (हेड ब्लाइट).

Recommendations

जैविक नियंत्रण

स्पोरोबोलोमायसेस रोसियस ही बुरशी कोच्लियोबोलस सॅटिव्हसची नैसर्गिक शत्रु आहे आणि धान्यामध्ये हिचा उपयोग रोगाच्या घटना आणि गंभीरता कमी करण्यासाठी केला गेला आहे. ह्या जंतुंचे इतर विरोधीही उपलब्ध आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. योग्य बुरशीनाशकाने बियाणांवर उपचार केल्यास बियाणांतुन जंतु पुढच्या हंगामात नेले जाण्याचा संभव कमी होतो.

कशामुळे झाले

कोच्लियोबोलस सॅटिव्हस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी ऊबदार आणि आर्द्र हवामानातील धान्य पीके घेणार्‍या भागात सामान्यपणे सापडते. ही मायसेलियम किंवा बीजाणू म्हणुन जमिनीत आणि रोपांच्या अवशेषात रहाते आणि वार्‍याने, पावसाच्या उडणार्‍या पाण्याने किंवा सिंचनाच्या पाण्याने हिचे वहन निरोगी रोपांवर होते. जव, गहू आणि रायव्यतिरिक्त ही पुष्कळ प्रकारच्या तण आणि गवतांवर संक्रमण करते. ओट ह्या रोगाचा प्रतिकार करतो पण ह्या जंतुंचा प्रसार करण्यात मदत करतो. जेव्हा हिला संवेदनशील यजमान मिळतो आणि हवामान अनुकूल असते, हिचे बीजाणू अंकुरतात आणि कोवळ्या रोपांवर किंवा त्यांच्या मुळांवर प्राथमिक संक्रमण सुरु करतात. थेट रोपाच्या त्वचेतुन किंवा नैसर्गिक छिद्रातुन किंवा जखमातुन ही रोपात शिरते. संक्रमित बियाणे किंवा शेतीची उपकरणेसुद्धा ह्या जंतुंचे वहन लांब अंतरापर्यंत करतात आणि पुढच्या पिकांसाठी लशीचे काम करतात. ह्या बुरशीच्या जीवनचक्राला ऊबदार हवामान (२८-३२ डिग्री सेल्शियस) चांगले मानवते.


प्रतिबंधक उपाय

  • ह्या जंतुच्या क्वारंटाइन नियमांबाबत जागरुक रहा.
  • प्रमाणित रोगमुक्त बियाणे निवडा.
  • विभाजित नत्राच्या वापराबरोबर योग्य खत नियोजन करा.
  • आपल्या पीकाला जोम देण्यासाठी सूक्ष्म घटकही घालण्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा