लिंबूवर्गीय

हिरवी आणि निळी बुरशी

Penicillium spp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फळांच्या सालींवर मऊ पाणी शोषल्यासारखे भाग येतात जिथे नंतर पांढरी बुरशी विकसित होते.
  • या बुरशीतील निळी किंवा हिरवी वाढ याला वैशिष्ट्यपूर्ण रंग देते.
  • डाग पसरतात आणि फळे अखेरीस कुजून गळतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

फळांच्या सालींवर मऊ पाणी शोषल्यासारखे भाग उमटणे ही सुरवातीची लक्षणे आहेत. काही दिवसांनंतर गोलाकार काही वेळेस काही सेंटीमीटर व्यास असणारी आणि थोडी उंचावटलेली पांढरी बुरशी या डागांवर येते. कालांतराने बुरशी सालीवर पसरते आणि बुरशी धरलेले जुने भाग निळसर किंवा हिरवट होतात. बाजुचे भागही पाणी शोषल्यासारखे मऊ होतात आणि त्यावरही पांढरे मायसेलियमचे मोठे पट्टे दिसु लागतात. फळे झपाट्याने कुजतात आणि गळतात किंवा कमी आर्द्रता असल्यास आक्रसतात आणि वाळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

सुडोमोनस सिरिंगे स्ट्रेन इएससी-१० वर आधारीत द्रवाणे वापरल्यास बुरशीवर जैविक नियंत्रण मिळविले जाऊ शकते. अॅगेराटम कोन्जियॉइड झाडाचा अर्कही बुरशीविरुद्ध परिणामकारक आहे. थायमस कॅपिटॅटस वनस्पतीचे अर्क तेल आणि नीम तेलाचे परिणाम सारखेच आहेत. सॅपोनिन चहाला सुरक्षित मिश्रण मानले जाते आणि याने काढणीनंतर फळांची कूज थांबविली जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. काढणी केलेल्या फळांना ४०-५० डिग्री सेल्शियस तापमानाच्या पाण्याने साबणाबरोबर किंवा कमकुवत क्षारयुक्त द्रावणाने धुतल्यास, बहुधा काही कीटकनाशके देखील वापरल्यास, फळांची कूज कमी होते. इमॅझालिल, थाइबेन्डाझोल आणि बायफिनेलसारखी बुरशीनाशक द्रावणांची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

पेनिसिलियम कुटुंबातील बुरशीच्या दोन प्रजातींमुळे लिंबुवर्गीय फळांची कूज होते. पी इटालिकम आणि पी. डिगिटॅटम फळांच्या सालीवर निळसर बुरशी आणि हिरवट बुरशी म्हणुन क्रमश: वाढतात. निळे डाग हिरवट डागांपेक्षा हळु वाढतात आणि त्यांचा विकास देखील जुन्या वाढीला केंद्रात ठेऊुन वैशिष्ट्यपूर्ण कोवळ्या पांढर्‍या मायसेलियमच्या पट्ट्याने होतो. ही संधीसाधु बुरशी असुन फळाच्या पृष्ठभागावरील जखमांचा वापर करुन आत शिरते आणि जीवनचक्र सुरु करते. जखमेच्या भागातुन झिरपणारे पाणी आणि पोषकांमुळे बीजाणू उगवतात. जेव्हा तापमान २४ डिग्री सेल्शियस होते, तेव्हा ४८ तासात संक्रमण होते आणि ३ दिवसात सुरवातीची लक्षणे दिसतात. वहन यंत्र, पाणी किंवा वार्‍याद्वारे बीजाणूंच्या प्रसाराने संक्रमण पसरते. हे बीजाणू बहुधा जमिनीत रहातात पण साठवणीच्या ठिकाणी संक्रमण झाले असता हवेतही दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • बागेत काम करताना फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • संक्रमित फळे बागेतुन काढुन टाका.
  • काढलेली फळे पॅकींगच्या जागेपासुन दूर ठेवा.
  • साठवणीत रोग विकसित होऊ नये म्हणुन थंड जागी साठवा.
  • फळांना कमी तापमान/उच्च आर्द्रता असलेल्या जागी साठवा.
  • पॅकींग आणि साठवणीच्या जागी वापरण्यात येणार्‍या हत्यारांना निर्जंतुकीकरणाचे साहित्य वापरुन स्वच्छ करा.
  • पाऊसात किंवा त्या नंतर लगेच काढणी करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा