कापूस

कपाशीवरील मूळकूज

Macrophomina phaseolina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • झाडांची पानगळ आणि मरगळ होते.
  • झाडे आडवी होतात.
  • मुळांची साल पिवळसर पडते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

झाडाची मर होणे (वाळणे) हे रोगाचे पहिले दृश्य लक्षण आहे आणि गंभीर प्रकरणांमध्ये पूर्ण पानगळ होऊ शकते किंवा झाड कोलमडू शकते. झपाट्याने मर होणे ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण खूण आहे, ह्यामुळे मुळकुज ही इतर रोगनिदानात जे रोग हीच लक्षणे दाखवितात, त्यापासुन वेगळे पाडता येते. सुरुवातीस, शेतातील काही झाडच प्रभावित होतात, परंतु कालांतराने हा रोग संपूर्ण क्षेत्रामध्ये गोलाकारपणे या संसर्गित झाडांच्या सभोवताली पसरतो. जमिनीच्या वरचा भाग वाळणे हे रोगाचे उशीरा झालेले प्रकटीकरण आहे, हे मुळे सडण्याचे आणि पाणी तसेच इतर पोषक तत्वे झाडाच्या वरच्या भागापर्यंत पोचत नाही त्याचे लक्षण आहे. काही काळानंतर झाडाची स्थिरता जाते आणि साध्या वार्‍यानेही झाडे कोलमडतात किंवा सहज उपटुन काढता येतात. मुळाची साल इतर सशक्त झाडांच्या तुलनेत पिवळसर दिसते अणि ती कुजून गळून जाते.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी कोणतेही जैविक उपचार कपाशीच्या मुळकुज विरोधात पूर्णपणे परिणामकारक ठरलेले नाही. ट्रायकोडर्मा बुरशीच्या काही प्रजातींचे उपचार देखील परिणामकारक ठरले आहेत कि त्यामुळे उपचारीत बियाणे जगण्याचे दर चांगलाच वाढला आणि त्यांचा विचार विक्रीकरीता केला जात आहे. झिंक सल्फेटची काही जैविक मिश्रणे फवारुन ह्याचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. बीजप्रक्रिया किंवा जमिनीतून विविध बुरशीनाशके जसे कि, थायराम, थिओफेनेट मिथिल, झिंक सल्फेट आणि कॅप्टनचा वापर हे मुळकुजचे नियंत्रण करण्यासाठी परिणामकारक आहेत.

कशामुळे झाले

मॅक्रोफोमिना फॅसिओलिना या बियाण्यात आणि जमिनीत राहणाऱ्या बुरशीमुळे ही लक्षणे दिसतात. जगात सगळीकडे कपाशीवरील हा रोग सापडतो आणि महत्वाचा मानला जातो. हा रोग साधारणपणे ३०० वेगवेगळ्या प्रकारच्या यजमानांना संक्रमित करतो त्यात, काळी मिरी, खरबुज किंवा काकडी ही येतात. हा जंतु जमिनीत जिवंत राहु शकतो आणि कपाशीच्या मूळांमध्ये खासकरुन वाढीच्या उत्तर काळात झटकन वेगळा काढता येतो. जेव्हा झाड दुष्काळ अनुभवतात तेव्हा ही बुरशी जमिनीत राहते आणि हा रोग बहुधा उन्हाळ्याच्या मध्यावर सर्वात जास्त वेळा उद्भवतो आणि शरद ऋतु बहरेपर्यंत कमी होतो. कोरडी माती, ज्यात १५-२० टक्केच ओलावा आहे आणि ३५ ते ३९ डिग्री सेल्शियसचे गरम तापमान ह्या बुरशीच्या वाढीसाठी सुगीचा काळ आहे.


प्रतिबंधक उपाय

  • दुष्काळ आणि बुरशीला सहनशील असणारे वाण वापरा.
  • मजबूत खोड असणाऱ्या व खाली ना लोळणाऱ्या वाणांची निवड करा.
  • पाते लागण्याचा काळ कोरड्या वातावरणात येऊ नये असे लागवडीचे नियोजन करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • विशेषत: पाते लागण्याच्या काळात सिंचनाच्या माध्यमातून जमिनीत चांगला ओलावा राहील याची काळजी घ्या.
  • संतुलित खत नियोजन सुनिश्चित करा आणि नत्राचा जास्त वापर टाळा.
  • उत्पादनात मोठे नुकसान टाळण्यासाठी पिकाची लवकर काढणी करा.
  • खोल नांगरुन पिकाचे अवशेष गाडा.
  • नांगरल्यानंतर उन्हाने जमिन तापू देणेही प्रभावकारी असते.
  • बारीक गहू, ओट्स, भात, जव आणि राय अशा यजमान नसलेल्या पिकांसोबत किमान तीन वर्षांसाठी तरी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा