केळी

केळीवरील ठिपके

Phyllosticta maculata

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पान आणि फळांवर काळसर, बहुधा बारीक (पण काही वेळेस मोठे देखील), गडद तपकिरी ते काळे ठिपके येतात.
  • ठिपके ओळीत गोळा झालेले असतात आणि देठ, मध्यशीर, उमलणारे पान आणि पुष्पकोशांवर देखील दिसू शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे पान आणि फळांवर विविध आकारांच्या काळ्या रंगाचे गडद तपकिरी ठिपके येणे होय. पानांचा पृष्ठभाग आणि फळाची साल खडबडीत लागते. बारीक ठिपके १ मि.मी. पेक्षा कमी व्यासाचे असतात. ठिपके ओळीत गोळा झालेले असतात आणि पानांच्या पृष्ठभागावर किंवा मध्य शीरेपासुन ते पानांच्या कडांपर्यंत शक्यतो शिरांच्या समांतर तिरप्या रेषेत दिसु शकतात. मोठे ठिपके ४ मि.मी. व्यासापर्यंत असु शकतात आणि ते सुद्धा पुंजक्याने एकत्रित येऊन रेषांसारखे दिसु शकतात. काही वेळा या मोठ्या ठिपक्यांचे केंद्र फिकट रंगाचे असते. देठ, मध्यशीरा, उमलणारी पाने आणि पुष्पकोशांवर देखील हे ठिपके उमटु शकतात. घड लागल्यानंतर २-४ अठवड्यात फळांवरही हे ठिपके उमटु शकतात. एकेकटे ठिपके प्रथमत: सूक्ष्म, लालसर तपकिरी आणि गडद हिरव्या प्रभावळीने नटलेले, पाणी शोषलेल्या भागासारखे दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

संक्रमित पानेही बीजाणूंचा प्राथमिक स्त्रोत असल्याने, पीक काढणीनंतर घडांना पिशवीने झाकल्यास बीजाणूंचा फळांवरील प्रसार रोखता येतो. नीम तेलाला (१५०० पीपीएम) ५मि.ली. दराने (१किलो) सर्फ किंवा (१मि.ली.) सँडोविटबरोबर प्रति ली. पाण्याबरोबर मिसळुन फुलधारणेच्या काळात आणि पहिले लक्षण दिसता क्षणीच वापरा. बुरशीविरुद्ध खनिज तेलाचा वापर देखील मदत करतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅनेबची फवारणी दर पंधरवड्यात किंवा महिन्यातुन एकदा असे वर्षभर पानांवर आणि फळांवर केल्यास बीजाणूंचा प्रसार खूप कमी होतो. फोलपेट, क्लोरोथॅलोनिल, मँकोझेब, ट्रायाझोल्स, प्रॉपिकोनॅझोल जातीच्या आणि स्ट्रोबिल्युरिन जातीच्या कीटनाशकांची फवारणी पंधरवड्याला केली असताही या रोगाविरुद्ध चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

फायलोस्टिक्टा मॅक्युलाटा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही केळीच्या सर्व टप्प्यांवर प्रभावित करु शकते आणि हिच्या बीजाणूंचा प्रसार होण्यासाठी पाण्याची ( उदा. पावसाचे थेंब, उडणारे पाणी, दवाचे थंब) गरज असते म्हणुन हिला 'ओल्या बीजाणुंचे' जंतु असेही म्हटले जाते. केळीवरील ठिपक्यांचा प्रसार संक्रमित झाडांची सामग्री आणि फळे यांच्या वहनाने देखील होऊ शकतो. ठिपक्यांमध्ये बुरशीचे बीजाणू तयार करण्याची संरचना असते. ते उगवल्यानंतर, बीजाणूंना केस फुटतात जे यजमान झाडात प्रवेश करून पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मध्ये वाढतात आणि झाडाच्या ऊतींच्या वरच्या थरात नवीन ठिपके किंवा व्रण तयार करतात. उष्ण आर्द्र हवामानात बीजाणू अंकुरण्यास फक्त २० दिवस लागु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • संक्रमित भाग छाटा आणि बागेपासुन दूर नेऊन नष्ट करा.
  • बुरशीविरहीत शेतात लागवड करण्याची काळजी घ्या.
  • उचित पद्धती वापरुन हत्यारे, बियाणे आणि जमिन निर्जंतुक करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा