मका

मक्यावरील तपकिरी ठिपके

Physoderma maydis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बारीक, पिवळे ते तपकिरी ठिपके पान, खोड, पर्णकोष आणि कणसाच्या सालीवर दिसतात.
  • पानाचा मोठा भाग रोगट पट्ट्याने व्यापते.
  • गडद तपकिरी ते काळे ठिपके पानाच्या मुख्य शिरेच्या बाजुने किंवा तिला लागुन येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

संक्रमणामुळे बारीक, पिवळे ते तपकिरी ठिपके पान, खोड, पर्णकोष आणि कणसाच्या सालीवर येतात. जसा रोग वाढत जातो, तसे हे ठिपकेही मोठे होत जातात आणि त्यांची संख्या देखील वाढते ज्यामुळे तयार होणारे रोगट भागांच धब्बे किंवा पट्टे पानांचा मोठा भाग व्यापतात. ठिपक्यांचा रंग बहुधा पिवळसर ते तपकिरी असतो आणि काही प्रकारच्या तांबेर्‍यांच्या लक्षणांची आठवण करुन देतात. तथापि, तांबेर्‍यांच्या विरु्ध, या रोगाचे चे डाग स्पष्ट पट्ट्याच्या रुपात वारंवार पानांवर, खासकरुन बुडाशी तयार होतात. आणखीन एक फरक म्हणजे ठळक गडद तपकिरी ते काळे ठिपके मध्य शिरेच्या बाजुने किंवा लागुन तयार होतात. संवेदनशील वाणात, मध्य शीर या डागांनी पूर्ण भरते आणि तपकिरी ते लालसर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाची होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

पी. मेडिसविरुद्ध जैविक उपचार सध्याच्या घटकेला तरी उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. नियमित मशागत हे या रोगाची घटना आणि संभाव्य प्रकोप टाळण्यासाठी सर्वात महत्वाची पध्दत आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पी. मेडिसविरुद्ध कोणतेही रसायनिक उपचारांची शिफारस करण्यात येत नाही कारण याच्या घटना फारच क्वचित होतात आणि उत्पादनावरील प्रभावही खूप कमी असतो.

कशामुळे झाले

फिसोडेर्मा मेडिस नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी संक्रमित पिकाच्या अवशेषात किंवा जमिनीत (अनुकूल परिस्थितीत ७ वर्षांपर्यंत) तग धरते. ज्या शेतात सतत मक्याची लागवड केली जाते किंवा पिकांचे भरपूर अवशेष आहेत, उदा. जिथे कमी मशागत केली जाते तिथे जास्त प्रमाणावर हा रोग आढळतो. संक्रमण सामान्यत: देठाभोवतालच्या पानांमध्ये सुरू होते, जेथे पावसाचे किंवा सिंचनानंतर पाणी जमा होते. इथुन दुय्यम संक्रमण वारा किंवा उडणार्‍या पाण्याबरोबर इतर भागात पसरतात. यावरुन जुन्या पानांच्या बुडाशी लक्षणे ठळक का दिसतात ते समजते. यासाठी सुर्यप्रकाश आणि तापमानाची आदर्श परिस्थिती देखील गरजेची असते. एकूणच, हा रोग गंभीर नाही आणि उत्पादनांवर किरकोळ परिणाम होतो.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या लक्षणासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • बुरशी संक्रमित पिकांच्या अवशेषात किंवा जमिनीत २-७ वर्षे तग धरत असल्याने पीक फेरपालट योजना मोठ्या कालावधीसाठी करा.
  • पिकांचे अवशेष खोल नांगरुन किंवा शेतापासुन दूर नेऊन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा