झुकिनी

वेलवर्गीय पिकांवरील अँथ्रॅकनोज करपा

Glomerella lagenarium

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाणी शोषल्यासारखे पिवळसर गोलाकार ठिपके पानांवर येतात.
  • गोलाकार, काळे, खोलगट ठिपके फळांवर येतात.
  • खोड वेढली जाऊन मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
काकडी
खरबूज
लाल भोपळा
झुकिनी

झुकिनी

लक्षणे

पाणी शोषल्यासारखे डाग जे नंतर पिवळसर गोलाकार धब्ब्यात बदलतात, यापासुन पानावरील लक्षणांना सुरवात होते. या डागांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अनियमित असतात आणि जसे ते मोठे होतात तसे ते गडद तपकिरी ते काळे पडतात. फांद्यांवरील डागही चटकन नजरेत भरतात आणि जसे ते वाढतात तसे ते वाहक भागांना वेढा घालतात ज्यामुळे फांद्या आणि वेली वाळतात. फळांवर मोठे, गोलाकार, काळे आणि दबलेले डाग येतात आणि नंतर कँकर बनतात. कलिंगडावरील डाग ६ ते १३ मि.मी. व्यासाचे आणि ६ मि.मी. खोल असतात. जेव्हा आर्द्रता असते तेव्हा या डागांचे काळे केंद्र चिकट गुलाबीसर बीजाणूंनी भरुन जाते. असेच डाग खरबुज आणि काकडीवर देखील दिसतात. गुलाबी रंगाचे कँकर्स हे वेलवर्गीय पिकांमधील रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहें

Recommendations

जैविक नियंत्रण

सेंद्रीयरीत्या मान्य असलेली कॉपरची द्रावणेसुद्धा या रोगाविरुद्ध वेलवर्गीय पिकांवर फवारली जाऊ शकतात आणि पूर्वी याचे परिणाम चांगले मिळाले आहेत. बॅसिलस सबटिलिस सारखे जैविक नियंत्रक घटक असणारी द्रावणे देखील उपलब्ध आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर वारंवार पाऊस पडत असेल तर मान्य बुरशीनाशकांचा वापर नियमित अंतराने पिकांवर थोडा जास्तच करा. बुरशीनाशकात क्लोरोथॅलोनिल, मॅनेब आणि मँकोझेबची द्रावणे उपलब्ध आहेत. सर्वात जास्त परिणाम देणारे उपचार म्हणजे क्लोरोथॅलोनिल सोबत मँकोझेबच्या पानांवरील फवारणीने मिळतात.

कशामुळे झाले

ग्लोमेरेला लेगेनॅरियम नावाच्या बुरशीमुळे पान आणि फळांवर ही लक्षणे उद्भवतात, जी पूर्वीच्या पिकाच्या अवशेषात किंवा वेलवर्गीय पिकांच्या बियाणात रहाते. वसंत ऋतुत हवामान जेव्हा जास्त ओलसर असते तेव्हा बुरशीचे हवेत तरंगणारे बीजाणू सोडले जातात जे वेलींना आणि जमिनीजवळच्या पानांना संक्रमित करतात. बुरशीचे जीवनचक्र जास्त करून सभोवतालची आर्द्रता, पानातील ओलावा आणि बर्‍यापैकी उच्च तापमानांवर अवलंबून असते, २४ अंश सेल्शियस इष्टतम मानले जाते. तपमान जर ४.४ अंश सेल्शियसच्या खाली किंवा ३० अंश सेल्शियसच्या वर गेले आणि जर त्यांच्यावर आर्द्रतेचे आवरण नसेल तर बीजाणू उगवत नाहीत. या व्यतिरिक्त, जंतुंच्या बिजाणूंना त्यांच्या चिकट अंड्यांतुन मोकळे करण्यासाठी पाण्याची गरज असते. या सर्वांवरुनच लक्षात येते कि मध्यमोसमात झाडी विकसित झाल्यानंतरच अँथ्रॅकनोज का स्थापन होतो ते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित, रोगमुक्त बियाणे वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास (बाजारात अनेक उपलब्ध आहेत) प्रतिकारक वाण निवडा.
  • पाने ओली असताना यंत्रे किंवा कामगारांची हालचाल शेतात होऊ देऊ नका.
  • जर तुषार सिंचनाचीच गरज असेल, तर सकाळी लवकर द्या ज्यामुळे झाडी रात्रीपर्यंत कोरडी होईल.
  • वेलवर्गीयांशी संबंधित नसणार्‍या पिकांशी तीन वर्षांसाठी पीक फेरपालट करा.
  • प्रत्येक हंगामाच्या शेवटी फळ आणि वेली खालील भाग नांगरून घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा