इतर

तृणधान्याच्या बुंध्यावरील करपा (क्राऊन रस्ट)

Puccinia coronata

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या वरच्या बाजूला मोठे, एका ओळीत फिकट नारिंगी रंगाचे फोड येतात आणि क्वचित पानांच्या पृष्ठभागांवर, देठ आणि फुलांच्या गुच्छावरही येतात.
  • पाने खूप जास्त पिवळी पडणे किंवा पिकणे ही लक्षणे बहुतेकदा या फोड्यांशी संबंधित आहेत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
जव

इतर

लक्षणे

पानांच्या वरच्या बाजूला मोठे, एका ओळीत फिकट नारिंगी रंगाचे फोड येतात आणि क्वचित पानांच्या पृष्ठभागांवर, देठ आणि फुलांच्या गुच्छावरही येतात. हे फोड बहुधा गटागटाने असतात. कालांतराने ते फिकट तपकिरी रंगाचे होतात आणि पाने खूप जास्त पिवळी पडणे किंवा पिकणेही होते. तथापी या संक्रमणामुळे पूर्ण झाड मरत नाहीत. करपटपणा विकसित झाल्यामुळे प्रकाश्संस्लेषण क्रियेचा दर कमी होतो ज्यामुळे वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते. दाणे बहुधा सुरकुतलेले असतात आणि त्यांची प्रतही कमी भरते. गंभीर संक्रमणात झाडे दुष्काळी परिस्थितीला संवेदनशील होतात ज्यामुळे विपरित हवामानात ती वाळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या रोगावर कोणतेही सेंद्रिय उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बाजारात प्रोपिनोकोनॅझोलवर आधारित उपलब्ध असलेले बरेचसे उत्पाद या जंतुंविरुद्ध वापरले जाऊ शकतात. फवारणी बुरशीसाठी अनुकूल नसलेल्या परिस्थितीमध्ये करण्याची शिफारस केली जाते

कशामुळे झाले

प्युसिनिया कोरोनाटा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. जी दोन मोसमांच्या मध्ये पर्यायी यजमानात किंवा शेतात पडलेल्या झाडाच्या अवशेषांमध्ये जगते. वसंत ऋतुच्या अनुकूल परिस्थितीत बुरशीची वाढ सुरु होते आणि ती बीजाणू निर्माण करते जे प्राथमिक संक्रमणाचे स्त्रोत होतात. पानांवर आलेले फोड दुसर्‍या प्रकारचे बीजाणू तयार करतात जे वार्‍याने उडुन संक्रमण करतात (लागणीचा दुय्यम स्त्रोत). जवाच्या वाढीच्या काळात या बुरशीचे खूप वेळा प्रजोत्पादन होते. ही बुरशी लागवड केलेल्या आणि जंगली प्रकारच्या जवाच्या आणि ओट्सच्या झाडांना तसेच विविध प्रकारच्या गवतांना आणि बकथॉर्न (र्हॅंमनस कॅथरटिका) चिरकाल टिकणार्‍या तणांना प्रभावित करते. उबदार (१५ ते २० डिग्री सेल्शियस) सूर्यप्रकाशित दिवस आणि सौम्य थंड रात्र (१५ ते २० डिग्री सेल्शियस) दव निर्मितीसाठी पुरेसा ओलावा असल्यास ते या बुरशीसाठी अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाणांची निवड या रोगास टाळण्याचा उत्तम उपाय आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा