केळी

केळीच्या पानावरील धब्बे

Cordana musae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पिवळे किंवा फिकट तपकिरी लंबगोलाकार धब्बे खालच्या पानाच्या कडाजवळ उमटतात.
  • लांब पट्टे असलेले करपट भाग दिसतात.ठळक पिवळी प्रभावळ असणार्‍या मोठ्या धब्ब्यात बदलतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

पिवळे किंवा फिकट तपकिरी, लंबगोलाकार किंवा डोळ्याच्या आकाराचे डाग खालील पानांच्या कडेवर येतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन त्यांचे केंद्र करपट बनतात आणि हळुहळु स्पष्ट आणि निश्चित समकक्ष क्षेत्र तयार होतात. पानांच्या वाढीबरोबरच शीरांच्या समांतर या डागांचे लांबट होणे देखील वाढते. बरेचसे डाग एकत्रित येऊन पिवळ्या किनार भागासकट मोठे करपट भाग तयार होतात. जेव्हा पानांच्या कडांवर संक्रमण झालेले असते, तेव्हा बारीक केंद्रीत डाग विकसित होतात जे कालांतराने वाढुन मोठ्या फिकट तपकिरी करपट भागाच्या पट्ट्यात बदलतात. पट्टे काही वेळा मध्यशीरेपर्यंत वाढतात. संक्रमित भागाच्या भोवती ठळक पिवळ्या प्रभावळीचे भाग असल्याने रोगट पाने पटकन लक्षात येतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगाविरुद्ध कोणतेही फक्त जैविक उपाय उपलब्ध नाहीत त्यामुळे केळीच्या बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. गंभीर संक्रमणात, जैविक कॉपर द्रावणे उदा. १% बोर्डो मिश्रण संक्रमित भागांवर फवारले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. केळीवर पानांवरील ठिपक्यांचे बरेच रोग असल्याने कोर्डाना पानांवरील ठिपकेच संक्रमित झाले आहेत आणि फ्रेकेल पानांवरील ठिपके किंवा सिगाटोका पानांवरील ठिपके नाहीत ना याची खात्री करा. गंभीर संक्रमात मँकोझेब ०.४% किंवा कॉपर ऑक्झि क्लोराइड ०.२-०.४% द्रावणावर आधारीत तेले वापरा. स्पर्शजन्य बुरशीनाशक जसे कि क्लोरोथॅलोनिल किंवा मँकोझेब आणि अंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. टेब्युकोनाझोल किंवा प्रोपिकोनॅझोलची शिफारस केली जाते. वापरलेले बुरशीनाशक शेंड्यावरील पानांवर देखील पोहोचतील याची खात्री करा.

कशामुळे झाले

कोर्डाना मुसे नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. हिला कोर्डाना पानांवरील डाग असेही ओळखले जाते. ही केळीवरील सर्वात महत्वाच्या बुरशीजन्य रोगातील एक आहे, जी बहुतेक केळीचे पीक घेणार्‍या भागात आढळते. बीजाणूंचे वहन उडणार्‍या पाण्याने आणि वार्‍याने होते ज्यामुळे दाट लागवडीत ती खूप नुकसान करते. बुरशीची वाढ उष्ण आणि दमट हवामानातील वारंवार पाऊस पडणार्‍या परिस्थितीत चांगली होते. संसर्गामुळे होणा-या पानांच्या नुकसानामुळे प्रकाश संश्लेषण करणारे भाग आणि उत्पादनात घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या क्षेत्रात उपलब्ध असल्यास (बाजारात भरपूर उपलब्ध आहेत) संवेदनक्षम वाण लावा.
  • पाने एकमेकांना स्पर्श करु नयेत आणि एकमेकांची सावली टाळण्यासाठी लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • नविन लागवड ही संक्रमित बागेपासुन पुरेशा अंतरावर आहे याची काळजी घ्या.
  • तुषार सिंचनाएेवजी ठिबक सिंचनपद्धती वापरून सापेक्ष आर्द्रता कमी करा.
  • संतुलित खते द्या आणि जास्त नत्र असलेली खते खास करुन टाळा.
  • संक्रमित पाने काढुन जाळुन टाका.
  • बागेतील जुनी वाळलेली पाने काढुन टाकणे यासारख्या बागा स्वच्छ राखण्याच्या सवयी ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा