जव

जवावरील तपकिरी तांबेरा

Puccinia hordei

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • छोटे, नारंगी-तपकिरी फोड पानांच्या वरील बाजुस दिसतात.
  • फोडांसभोवती फिकट प्रभावळ असते.
  • काळे फोड पानांच्या खालील बाजुस दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
जव

जव

लक्षणे

छोटे, गोलाकार, नारंगी-तपकिरी फोड पानांच्या वरच्या बाजुला अनियमिततेने विखुरलेले असणे ही पहिली लक्षणे हिवाळ्यात उशीरा दिसतात. ह्यात बीजाणू असतात जे विभिन्न जवाच्या झाडांवर संक्रमण प्रक्रिया करतात. क्वचितच हे फोड फांद्यांवर, पर्णकोषावर आणि कणसांवरही येतात. ह्या फोडांसभोवताली पिवळी किंवा हिरवी प्रभावळ असते. हंगामात नंतर (वसंत ऋतुत उशीरा किंवा उन्हाळ्यात लवकर) छोटे काळे फोड हळु-हळु पानांच्या खालच्या बाजुस येतात. ह्या नव्या फोडात बीजाणू असतात जे नंतर संक्रमण चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी पिकांच्या फुटव्यात किंवा पर्यायी यजमानांत जगतात. फिक्या तपकिरी फोडांच्या उलट काळे फोड जर हाताने चोळले तर चोळले जात नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत जवावरील तपकिरी तांबेर्‍याच्या नियंत्रणाचे जैविक उपाय उपलब्ध नाहीत. जर आपणांस काही माहिती असतील तर कृपया संपर्क साधावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रोथिकोनाझोलवर आधारीत बुरशीनाशकांची वेळशीर फवारणी बहुधा तपकिरी तांबेर्‍याचे नियंत्रण करण्यात मदत करते. जवl̥च्या पानांवरील तांबेर्‍याचे उपचार करण्यासाठी अनेक बुरशीनाशके उपलब्ध आहेत. चांगले नियंत्रण मिळविण्यासाठी बुरशीनाशकांचा वापर पानांवरील तांबेरा दिसताक्षणीच करावा. जर तांबेरा रोगास हवामान अनुकूल असल्यास अतिरिक्त वापराची आवश्यकता भासू शकते.

कशामुळे झाले

पुसिनिया होर्डेज नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात, जी जवावर तांबेरा आणणार्‍या चार प्रकारच्या बुरशींपैकी एक आहे. हे जंतु फक्त हिरव्या झाडांवरच जगतात. पी. होर्डेइ च्या बाबतीत उन्हाळ्यात ती फक्त उशीरा येणार्‍या फुटव्यात आणि स्टार ऑफ बेथलेहम (ऑर्निथोगॅलम अम्बेलाटम) सारख्या पर्यायी यजमानातच जगते. उबदार तापमान (१५ ते २२ अंश), सह उच्च आर्द्रता आणि वारंवार पडणारा पाऊस रोग विकसनास अनुकूल आहे तर कोरड्या वार्‍याचे दिवस बीजाणूंच्या प्रसारात मदत करतात. तपकिरी तांबेर्‍याचे जवावरील पुष्कळसे हल्ले हे बहुधा हंगामात उशीराच होतात, खासकरुन जेव्हा नत्राची उच्च मात्रा दिली जाते. उशीरा लागवड केलेल्या पिकांपेक्षा लवकर लागवड केलेली पिके जास्त गंभीरपणे संक्रमित होतात, खासकरुन जेव्हा त्याकाळातील रात्रीही चांगल्याच ऊबदार असतात. तरीही, जर पिकांवर बुरशीनाशकांचे उपचार केलेले असले तर तपकिरी तांबेर्‍याचा जास्त त्रास होत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण लावा कारण जंतुंचे चक्र तोडण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
  • लवकर पेरणी करणे टाळा.
  • वसंत ऋतुच्या सुरवातीपासुनच लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करीत चला.
  • मागच्या हंगामातील संक्रमण यंदाच्या हंगामातही होऊ नये म्हणुन काढणीनंतर शेतातील तण आणि पर्यायी यजमान काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा