कॅनोला

काळी कूज

Plenodomus lingam

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर काळ्या ठिपक्यांसह गोलाकार, फिकट राखाडीसर डाग आणि गडद करपट डाग येतात.
  • दोन्ही प्रकारच्या डागांसभोवताली पिवळसर प्रभावळ असते.
  • खोडांवर राखाडीसर डाग येतात जे नंतर कँकर्समध्ये बदलतात.
  • जसे ते वाढतात तसे ते कँकर्स खोडाला वेढतात आणि अशक्त करतात ज्यामुळे झाड कोलमडतात आणि मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
कोबी
कॅनोला
फुलकोबी

कॅनोला

लक्षणे

पिक किंवा त्याचे वाण, जंतुही आणि त्यावेळची हवामान परिस्थिती या सर्वांवर लक्षणांची गंभीरता अवलंबुन आहे. कोणत्याही परिस्थितीत, मुख्य लक्षणे पानांवर आणि खोडावरच दिसतात. पानांवरील डाग काळ्या ठिपक्यांचे गोलाकार, फिकट राखाडीसर डाग आणि गडद करपट डाग असे दोन्ही प्रकारचे असु शकतात. पिवळी रंगहीनता पानांच्या शिरांवर किंवा असे पूर्ण धब्बे डागांच्या आजुबाजुस दिसणे (पिवळी प्रभावळ) सामान्य आहे. खोडावरही राखाडीसर डाग येतात जे बारीक, आयताकृती, तपकिरी डाग येतात जे नंतर कँकर्समध्ये बदलुन पूर्ण खोडास वेढतात. काळसर ठिपके या डागांवर दिसतात. जसे ते वाढतात तसे हे कँकर्स खोडास वेढतात आणि अशक्त करतात ज्यामुळे लवकर पक्वता, झाडाची कोलमड आणि मर होते. शेंगांवरही लक्षणे काळ्या कडांच्या तपकिरी डागांच्या रुपाने दिसतात ज्यामुळे अकाली पक्वता आणि बियाण्यातील संक्रमण होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगासाठी कोणतेही जैविक उपाय उपलब्ध नाहीत. जर आपणांस काही माहिती असेल तर कृपया संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर बुरशी खोडात पोहोचली असेल तर बुरशीनाशकांचा परिणाम अत्यंत कमी होतो आणि जर शेतात जास्त उत्पन्न अपेक्षित असेल तरच उपचार केले जावेत. प्रोथियोकोनाझोलचा वापर फवारणी द्वारे करावे. सक्रिय बीजोपचारासाठी प्रोक्लोराजसह थायरामचा वापर केल्यास बियाणेजन्य फोमा जंतुंचे कोवळ्या रोपातील संक्रमण कमी होते.

कशामुळे झाले

काळी कूज (ज्याला खोडाचे फोमा कँकर्सही म्हटले जाते) हे खरतर बुरशीच्या लेप्टोस्फेरिया मएक्युलान्स आणि एल. बिब्लोबोसा नावाच्या दोन प्रजातींमुळे होतात. ते बियाण्यात किंवा झाडाच्या धसकटात आपली सुप्तावस्था घालवतात. वसंत ऋतुतील ऊबदार आणि आर्द्र वातावरणाची सुरवात झाली कि ते बीजाणू तयार करतात. या बीजाणूंचे वहन वार्‍याने किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याने निरोगी झाडांच्या भागांवर खासकरुन खालच्या पानांवर आणि खोडावर होते. झाडात बीजाणूंची ऊगवण आणि बुरशीची वाढ झाल्याने लक्षणे दिसतात. जर बियाण्यातील दल संक्रमित झाले तर हंगामाच्या सुरुवातीलाच रोप मर होते. बुरशीचा प्रसार फांदीवरील कोवळ्या पानांपासुन, देठ आणि फांदीच्या सांध्यात किंवा झाडाच्या बुडाच्या सभोवताली कॅन्कर्स तयार करून होते. ह्यामुळे झाडाच्या भागांना पाणी आणि पोषकांचा पुरवठा होत नाही आणि परिणामी रोप कोलमडते आणि मर होते. मोहरी आणि अन्य कोबीवर्गीय (कॅनोला, सलगम, ब्रॉकोली, ब्रुसेल्स स्प्राउटस, कोबी) पिकातील हा महत्वाचा रोग आहे.


प्रतिबंधक उपाय

  • या रोगाविरुद्ध सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे, जर ते आपल्या आवडीच्या पिकासाठी उपलब्ध असेल तर प्रतिकारक वाण लावणे होय.
  • यजमान नसणार्‍या पिकांसह पिक फेरपालट करा.
  • काढणीनंतर नांगरुन झाडांचे अवशेष गाडा.
  • उथळ मशागत केल्याने देखील बुरशीस खालील पाने आणि खोडापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा