डाळिंब

डाळिंबावरील कवडी करपा

Glomerella cingulata

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पिवळ्या प्रभावळीचे काळे ठिपके येतात.
  • नंतर पूर्ण पानास ग्रासतात.
  • अकाली गळणे.
  • कोरडी, तपकिरी ते काळी रंगहीनता फळांवर दिसते.
  • दाण्यांच्या शेंगा कुजतात.
  • फांद्यांवर कँकर्स दिसतात.
  • मुळे एकमेकांवर चढतात आणि खोडाला वेढतात ज्याने झाड मरते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

डाळिंब

लक्षणे

बुरशीमुळे कोणत्या भागावर हल्ला झाला आणि हवामान ह्याप्रमाणे खूप प्रकारची लक्षणे दिसतात. पानांवर, फांद्यांवर, फुलांवर किंवा फळांवर बहुधा पिवळ्या प्रभावळीचे अतिसूक्ष्म विविध रंगांचे खोलगट डाग येतात. पानांवर हे डाग मोठे होऊन व्रण तयार करतात आणि पात्याचा मोठा भाग व्यापतात. ते पिवळे पडुन अकाली गळतात त्यामुळे पानगळ होते. फळांवरील डाग तपकिरी ते काळे, पहिल्यांदा गोलाकार, नंतर जसे मोठे होतात तसे बेढब असतात. फळे नंतर मऊ पडतात आणि बियांणांच्या टरफलांवर बुरशी विकसित होते जी गडद राखाडी किंवा काळी असते पण द्रवरुपी नसते. अँथ्रॅकनोज काटक्या आणि फांद्यांवरही हल्ला करते ज्यामुळे कँकर्स, म्हणजे व्रण, जे भाग खोलगट होतात, संसर्गित भागाच्या कडा सूजलेल्या दिसतात. खोडातील संसर्ग क्वचित वेढतो आणि मर होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

अॅस्पेरगिलस फ्लॅव्हस, हायपोसेरा रुफा, हायपोनेक्ट्रिया ट्युबेरक्युलॅरिफॉर्मिस आणि नेक्ट्रिएला म्युलेरि हे माहितीतले स्पर्धक जैविक घटक आहेत. फक्त पहिलाच खरा विरोधी आहे. इतर परजीवी किंवा जंतु आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलधारणा सुरु होताना आणि हवामान परिस्थिती बुरशीला अनुकूल असताना पहिला प्रतिबंधक फवारा मारावा. नंतर गरज भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारे मारावेत. प्रॉपिकोनाझोल, मँकोझेब किंवा मँकोझेब आणि ट्रायसायक्लाझोल यांचे संयोग हे सक्रिय घटक आहेत. ज्या बुरशीनाशकांना डाळिंबासाठी नोंदणीकृत केले आहे फक्त त्याचेच फवारे मारावेत. दिलेल्या तीव्रतेचे पालन करणे आणि प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन बुरशीनाशकांना विविध रुपात वापरणे अतिशय महत्वाचे आहे.

कशामुळे झाले

ग्लोमेरेळा सिग्युलाटा नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ही संसर्गित रोपांच्या जमिनीवरील अवशेषात किंवा कडक झालेल्या फळात रहाते. वसंत ऋतुत हिचे बीजाणू पावसाच्या उडणार्‍या पाण्याने किंवा वार्‍याने पसरतात आणि शेजारच्या काटक्या किंवा रोपांना संसर्गित करतात. फुल आणि फळ विकसनचा काळ हा फार संवेदनशील काळ आहे. काटे, किडे आणि प्राण्यामुळे रोपांना झालेल्या जखमातुन संसर्गाच्या प्रक्रियेला बढावा मिळतो. वारंवार पडणारा पाऊस, जास्त आर्द्रता (५०-८०%) आणि २५-३० अंश तापमान बुरशीच्या जीवनचक्राला अनुकूल असते. तरीपण ही कोरड्या काळात निष्क्रिय असते. थोडा संसर्गही फळांचे रुप बिघडवतो आणि त्यांच्या साठवणीच्या काळात घट होते. आंबा, पेरु आणि पपया हे पर्यायी यजमान आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडील निरोगी रोप सामग्री वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास सहनशील वाण लावा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी रोपांत पुरेसे अंतर राखा.
  • शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या आणि फवारा सिंचन करु नका.
  • पाने उमलल्यानंतर आणि वसंत ऋतुतील पाऊस थांबल्यानंतर खत द्या.
  • उत्पन्नावर प्रभाव पडु नये म्हणुन आपल्या पिकांना योग्य खते द्या.
  • शेतात तण नियंत्रणासारख्या सवयी वागवुन चांगली स्वच्छता राखा.
  • रोपांचे उपकरणांद्वारा किंवा शारीरिक नुकसान होऊ देऊ नका.
  • आपल्या रोपांचे किंवा शेताचे खासकरुन फुल आणि फळ विकसनाच्या काळात रोगाच्या लक्षणांसाठी निरीक्षण करा.
  • थंडीत छाटणी करा आणि छाटणीचे साहित्य निर्जंतुक करुन घ्या.
  • मोसमात आणि शरद ऋतुत गळलेली पाने आणि संसर्गित काटक्या आणि फांद्या गोळा करुन काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा