भात

भातावरील फोमा सोरघिना नावाची बुरशी

Epicoccum sorghinum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बी आणि जमिनिजन्य बुरशी जो अशक्त झाडांना प्रभावित करते.
  • गडद तपकिरी कडा असलेले लांबट किंवा अनियमित आकाराचे ठिपके विकसित होणार्‍या लोंब्यात लाल किंवा पाणी शोषल्यासारख्या डागगात रुपांतरीत होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

रोगाचे प्राथमिक लक्षण पाणी शोषल्यासारखे डाग लोंब्यावर उमटणे असते. हे डाग नंतर मोठे होऊन आयताकृती किंवा बेढब होतात ज्यांची कडा गडद तपकिरी असुन केंद्र पांढरे असतात. जर संक्रमण पोटरी अवस्थेच्या आधी झाले तर लोंब्या कूजतात आणि अखेरीस वाळतात. जेव्हा लक्षणे फुले आल्यानंतर येतात तेव्हा दाणे पूर्ण भरत नाहीत आणि अर्धेच भरतात आणि ग्लुमवर (ग्लुम ब्लाइट) बेढब डाग दिसतात. गंभीर प्रकरणांमध्ये, संवेदनाक्षम जातींमध्ये (उदा. चायना बोरो) ९५% पर्यंत ओंबीचे नुकसान होते. जोरदार पावसाबरोबर वारावादळ, पाणी भरलेले शेत आणि चांगले ऊन हे रोगाला मानवते. ग्लुम ब्लाइटला उंचावरील भातशेतीत कमी आर्थिक महत्वाचा मानले जाते पण जर नियंत्रण केले गेले नाही तर साथ येऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

या दिवसापर्यंत तरी या रोगाची घटना किंवा गंभीरता कमी करण्यासाठी कोणतेही जैव नियंत्रण उपलब्ध नाही. जर आपणांस काही कळले तर आम्हास जरुर कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशके वापरुन बीज प्रक्रिया केली जाऊ शकते आणि त्यामुळे भाताच्या काही जातीतील नैसर्गिकपणे संक्रमित बियाणांत पी. सोरघिनावर चांगले नियंत्रण मिळु शकते. इप्रोडियोन आणि कॅप्टनचा वापर केला जाऊ शकतो पण १००% परिणामकारक नाही.

कशामुळे झाले

बियाणे आणि जमिनीत रहाणार्‍या एपिकोकम सोरघी जिला आधी फोमा सोरघिना नावाने ओळखले जात असे, ह्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ही संधीसाधु बुरशी आहे जी अशक्त किंवा ताण पडलेल्या रोपांत शिरते आणि जरी ती मुख्यत्वेकरुन ज्वारी, बाजरी, ऊस आणि भातासारख्या (ग्रामिने) आर्थिक महत्वाच्या पीकांशी संबंधित असली तरी ती जगातील इतर पुष्कळशा यजमानांना बाधीत करु शकते. अॅकाशिया, अॅलो, लिंबूवर्गीय आणि निलगीरी च्या काही प्रजाती इतर पर्यायी यजमानांत येतात. बुरशी पीकांच्या अवशेषात रहाते असे दिसते, तरी आफ्रिकेत ही गवती छपरांवर आणि गुरांच्या चार्‍यातही पाहिली गेली आहे. ही मायकोटॉक्झिन्स तयार करते ज्यामुळे रोपात लक्षणे उद्भवतात आणि मानवी तसेच प्राण्यांच्याही स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. मानवावर लक्षणे त्वचेवर लाल जखम, तोंडात फोडे आणि काही बाबतीत कर्करोग हेही स्पष्टपणे होऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • शेतातुन नियमित पाण्याचा निचरा करण्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा