लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय पिकातील पानावरील बुरशीजन्य करपा

Pseudocercospora angolensis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर गडद तपकिरी कडा व पिवळे केंद्र असणारे फिकट तपकिरी ते राखाडी रंगाचे गोल ठिपके दिसतात.
  • नव्या फळांवर पिवळ्या प्रभावळीसह गाठीसारखी उंचवटलेली वाढ दिसते असतात.
  • जुन्या फळांवर सपाट व्रण दिसतात काही वेळा त्याचा मध्य खोलगट तपकिरी असतो.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

गोलाकार बहुधा एकेकटे ठिपके पानांवर दिसतात आणि ते १० मिमी. व्यासापर्यंत वाढु शकतात. कोरड्या हवेत त्यांचा मध्य फिकट तपकिरी किंवा राखाडी असतो, ज्याला लालसर कडा आणि नजरेत भरणारी पिवळी प्रभावळ असते. पाऊस सुरु झाल्यानंतर, ते काळे पडतात आणि बीजाणूने आच्छादतात, जे खासकरुन पानाच्या खालच्या बाजुला दिसते. जसा रोग वाढतो, ठिपके एकमेकांत मिसळतात आणि पाने पिवळी पडतात, काही वेळा यानंतर पानगळ देखील होते. काहीवेळा धब्ब्याचा मध्य गळुन पडतो आणि बंदुकीच्या गोळीच्या छिद्रासारखा परिणाम दिसतो. हिरव्या फळांवर गोल किंवा अनियमित आकाराचे ठिपके, वेगवेगळे किंवा मिसळलेले, बहुधा पिवळ्या प्रभावळीसकट असतात. गंभीर संसर्गाने ते काळे, उंचवटलेले, गाठीसारखे वाढतात व कालांतराने करपून गळतात. परिपक्व फळांवर व्रणांचा आकार वेगवेगळा असतो पण साधारणपणे ते चपटेच असतात. कधीकधी त्यांचा मध्य खोलगट तपकिरी असतो. हे व्रण शक्यतो देठापासून सुरुवात होऊन खोडावर दिसु शकतात. या व्रणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास झाड मरु शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

सायट्रस लॅटिफोलिया आणि सायट्रस लिमोनच्या प्रतिकारक जातींच्या फळांतुन काढलेली नैसर्गिक तेले या बुरशीची वाढ कमी करतात. लाईम लीफ अर्क आणि सायट्रस औरान्टीफोलिया तसेच बॉटलब्रशच्या झाडांच्या (कॅलीस्टेमॉन सिट्रिनस आणि कॅलीस्टेमॉन रिजिडस) पानांचे तेल या जंतुंना मज्जाव करतात. अजुनपर्यंत तरी या परिणामांची चाचणी फक्त प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात करण्यात आली आहे. कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर देखील केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर. ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन आणि मँन्कोझेबवर आधारीत बुरशीनाशके खनिज तेलासोबत फवारणी केल्याने बुरशी पूर्णपणे संपविण्यात चांगला परिणाम दिसला. क्लोरोथालोनिल, कॉपर आणि त्यांच्या मिश्रणावर आधारीत बुरशीनाशके देखील प्रभावी आहेत. पावसानंतर फवारणी करण्याची शिफारस केली जाते, कारण पावसामुळे बीजाणू उत्पादन सुलभ होते.

कशामुळे झाले

सुडोसरकोस्पोरा अॅन्गोलेनसिस नावाच्या बुरशीने ही लक्षणे होतात. ते बीजाणू तयार करण्याचा अनुकूल काळ येईपर्यंत शक्यतो संक्रमित झाडाच्या सुप्त व्रणात जिवंत रहातात. या बुरशीच्या जीवनक्रमाला दीर्घ काळ आर्द्र हवामान आणि त्या नंतर २२-२६ डिग्री सेल्शियस मध्यम थंड तापमानासह कोरडे वातावरण फार अनुकूल असते. पाने हे संसर्गाचे प्राथमिक स्त्रोत आहेत, कारण फळांवरील व्रणांपेक्षा पानांतील व्रणात जास्त बीजाणू तयार होतात. लांब अंतरापर्यंत बुरशीचे पसरणे हे हवेतुन बीजाणू वाहुन नेल्याने होते तर जवळपासचा संसर्ग मुख्यतः पावसाच्या मार्‍याने किंवा थेंबांनी होतो. मानव संक्रमित सामग्री इतर शेतात किंवा ठिकाणी पाठवून रोग पसरवू शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण वापरा.
  • गळलेली फळ आणि पाने जमा करून खोल पुरा किंवा जाळुन नष्ट करा.
  • शेताच्या कडेने वार्‍याचे अडथळे तयार करून शेजारच्या बागे पासुन आलेले संक्रमण टाळता येते.
  • शेतात हवा चांगली खेळती ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • नियमितपणे छाटा आणि पर्यायी यजमानांसोबत आंतरपीक करू नका.
  • फळे येण्याच्या सुमारास पाणी देण्याची वेळ जुळवुन घ्या.
  • दूषित भागातील संक्रमित कलम, झाड किंवा फळांची वाहतूक टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा