भात

भातावरील खोडकूज

Magnaporthe salvinii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पर्णकोषांवर बारीक, अनियमित काळे डाग येतात.
  • डाग मोठे होतात.
  • पेरे कुजतात आणि कोलमडतात.
  • कोंब मरतात, कोलमडतात, कणसे भरत नाहीत, दाणे खडुसारखे असतात.
  • संक्रमित खोडाच्या आतील भागात गडद राखाडीसर बुरशी दिसते..

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

लक्षणे पोटरी अवस्थेनंतरच दिसतात. प्रारंभिक लक्षणात पाण्याच्या स्तराजवळील बाहेरच्या पर्णकोषांवर लहान, अनियमित काळे डाग येतात. जसजसा रोग वाढत जातो हे डाग मोठे होऊन पर्णकोषाच्या आत आणि ओंबीच्या देठात शिरकाव करुन तपकिरी काळे डाग निर्माण करतात. खोडाची एक किंवा दोन पेरे अखेरीस कुजतात आणि आडवे होतात (फक्त साल अबाधित रहाते), ज्यामुळे कोलमडणे, ओंब्या न भरणे, खडुसारखे दाणे किंवा कांड्याची मर होते. गडद राखाडीसर मायसेलियम संक्रमित पोकळ खोडात दिसते ज्यात बारीक काळे स्क्लेरोशिया ठिपके आतील पृष्ठभागावर येतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

खोडकुजीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या पद्धतीमध्ये चांगल्या शेतीच्या सवयी आणि शत्रु जंतूचा वापर समाविष्ट आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. व्हॅलिडामायसिन किंवा हेक्झाकोनाझोल (२ मि.ली./ली) प्रॉपिकोनाझोल (१ मि.ली./ली.) किंवा थियोफेनेट मिथाइल (१.० ग्रॅ./ली.) पाणी ह्यावर आधारीत रसायने, दिलेल्या दराने १५ दिवसांच्या अंतराने दोनदा, बहुधा पोटरी अवस्थेच्या मध्यापासुन किंवा रोग सुरु होण्याच्या वेळेपासुन वापरावीत.

कशामुळे झाले

मॅग्नापोर्थे सालविनि नावाच्या बुरशीमुळे नुकसान उद्भवते, जी मृत रोपांच्या अवशेषात किंवा जमिनीत रहाते. नंतर जेव्हा परिस्थिती अनुकूल (जास्त आर्द्रता, जास्त नत्र खते) असते तेव्हा हिचे बीजाणू पावसाच्या आणि सिंचनाच्या उडणार्‍या पाण्याने पसरतात. जेव्हा ते पानांवर पडतात तेव्हा ते पृष्ठभागाला चिकटतात आणि पानाच्या पातळ सालीतुन बोगदे बनवितात. ज्या रोपांवर अयोग्य शेती सवयींमुळे किंवा किड्यांच्या हल्ल्यामुळे जखमा झालेल्या असतात त्या ह्या प्रक्रियेला सोपे करतात. जसे झाड पक्वतेकडे पोचते तशी रोगाची तीव्रता फारच वाढते. उष्णकटिबंधात, काढणीनंतरचा जास्त आर्द्रतेचा काळ बुरशीच्या जीवनचक्रास अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची लागवड करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेऊन रोपांची दाटी कमी करा.
  • जीवाणुंचा शिरकाव थांबविण्यासाठी शेतातुन पाण्याचा निचरा करा.
  • नत्राचे प्रमाण कमी करा आणि विभाजित करुन वापरा.
  • जमिनीचा सामू उच्च राखण्यासाठी पालाशाची पातळी वाढवा.
  • तणांचे वेळेत नियंत्रण करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे अवशेष काढुन जाळा किंवा अवशेषांना कुजु द्या.
  • सिंचनाचे पाणी साचणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा