मका

मक्याच्या पानावरील ठिपके

Kabatiella zeae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • खालच्या पानांवर बारीक, पाणी शोषल्यासारखे, गोल डाग उमटतात.
  • हे डाग नंतर "डोळ्यांच्या आकारांच्या ठिपक्यात" बदलतात ज्यांची केंद्र गव्हाळ आणि कडा गडद तपकिरी असतात.
  • कालांतराने ते एकमेकात मिसळुन पिवळट किंवा करपट भाग तयार करतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

खालच्या पानांवर बारीक, पाणी शोषल्यासारखे, गोल डाग उमटतात. हे डाग नंतर "डोळ्यांच्या आकारांच्या ठिपक्यात" बदलतात ज्यांची केंद्र गव्हाळ आणि कडा गडद तपकिरी आणि मोठ्या पिवळ्या "प्रभावळीचे" असते. कालांतराने ते एकमेकात मिसळुन पिवळट किंवा करपट भाग तयार करतात. जुन्या पानांवर डाग येणे सर्वसामान्य आहे पण काहीवेळा पर्णकोष आणि कणसावरही दिसु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

कॅबाटिएल्ला झीवरील कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उत्पादन किती येईल, पिकाची किंमत, बुरशीनाशकाची किंमत या सर्व गोष्टींचा विचार करुनच बुरशीनाशकांचा वापर करा. मँकोझेब, प्रॉपिकोनॅझोल आणि क्लोरोथॅलोनिल हे बुरशीनाशकाच्या उपचारात येतात. या बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया देखील विचारात घेतले जाऊ शकते.

कशामुळे झाले

बुरशी मक्याच्या जमिनीतील अवशेषात जगते आणि बियाणांतही पाहिली जाऊ शकते. वसंत ऋतुमध्ये ती बीजाणू तयार करते जी वारा किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याच्या थेंबांनी नविन पीकांवर जाते. दुय्यम संक्रमण वारा किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याच्या थेंबांनी एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर होते. पाने ओली रहाणे, थंड हवामान, वारंवार पाऊस, आणि दवाने रोगाची साथ येते. उष्ण आणि कोरडी हवा त्याची वाढ कमी करते. एकच पीक घेणे, उथळ नांगरणे यासारख्या सवयींनीही बुरशीच्या विकासाला हातभार लागते. जर फुलोरा येण्याच्या किंवा कणीस तयार होण्याच्या टप्प्यावर झाडाच्या वरच्या भागात बुरशी पसरली तर झाडाची उत्पादकता आणि उत्पन्न कमी येते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • पीक घेतल्यानंतर नांगरुन रोपांचे अवशेष गाडुन टाका.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर २ किंवा अधिक वर्षांसाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा