सोयाबीन

सोयाबीन मधील अकाली मृत्यू

Fusarium virguliforme

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या शिरांमधील भागात विखुरलेले, पसरलेले, पिवळे ठिपके उमटतात.
  • हे ठिपके वाढून करपट भाग तयार होतात व कालांतराने गळतात.
  • खोड आणि मुळांत कुजीची तपकिरी रंगहीनता दिसते.
  • फुल गळ होते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

पानांवर फुले येण्याच्या सुमारास बारीक, फिकट हिरवे गोलाकार ठिपके उमटतात. पानांच्या शिरांमधील भाग पिवळे पडून करपतात. जसजसा रोग वाढतो, शिरांमधील करपट भाग वाळतात आणि गळतात ज्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात. अखेरीस पाने वाळतात, गोळा होतात किंवा गळतात पण देठ मात्र फांदीलाच लटकुन रहातात. कूजीची लक्षणे (तपकिरी रंगहीनता) खालील फांद्या आणि मुख्य मुळांच्या पेशीत दिसतात. फुल गळ होते आणि शेंगा वाढत किंवा भरत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी या बुरशीविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण ज्ञात नाही. जर आपल्याला काही माहिती असली तर आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ही बुरशी मुळात रहात असल्यामुळे बुरशीनाशकांची फवारणी परिणामकारक नाही. त्याऐवजी फ्ल्युपायरम सारखी खास बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करा.

कशामुळे झाले

फ्युसॅरियम व्हिरग्युलिफोर्म बुरशी बीजाणू म्हणुन जमिनीत किंवा संक्रमित पीकांच्या अवशेषात रहातात. वनस्पती वाढीच्या सुरवातीला ते मुळातुन रोपात शिरुन घर करुन संक्रमण करतात पण लक्षणे मात्र फुलोरा येण्याच्या वेळेसच दिसतात. संक्रमणास थंड आणि ओली जमीन अनुकूल असते. सुत्रकृमी, किटक व शेतीउपयोगी अवजारांमुळे झालेले जखमांमुळे या रोगाच्या संक्रमणाची जोखिम वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • पाण्याचा निचरा चांगला राहील या कडे लक्ष द्या.
  • उच्च प्रतीची प्रमाणित बियाणे वापरा.
  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • प्रतिकूल हवामान परिस्थिती टाळण्यासाठी हंगामात लवकर पेरणी करा.
  • शेतात चांगली खेळती हवा ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • माती घट्ट न होण्यासाठी मशागत करा.
  • ठराविक काळासाठी यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा