भात

भातावरील पर्णकोष कुजवा

Sarocladium oryzae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • ठिपक्यांसारखे डाग ओंबीला झाकणाऱ्या वरच्या पानांवर आढळतात.
  • पर्णकोष कुजतो.
  • पांढऱ्या भुकटी सारखी बुरशीची वाढ दिसुन येते.
  • दाणे रंगहीन असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

प्राथमिक लक्षणे म्हणजे आयताकृत ते ओबड धोबड डाग (०.५ ते १.५ मि.मी.) ओंबीला झाकणाऱ्या पानांवर दिसतात. ठिपक्यांचे वैशिष्ट्य असते राखडी केंद्र आणि तपकिरी कडा व ते बहुधा एकमेकांत मिसळतात ज्यामुळे पर्णकोष कुजून रंगहीन होतो. गंभीर संक्रमणात ओंब्या निघत नाहीत. संक्रमित पर्णकोषांच्या बाहेरच्या पृष्ठभागावर दाट पांढरी भुकटी सारखी बुरशीची वाढ दिसुन येते. ओंबीत तयार होणारे दाणे रंगहीन आणि वांझ असतात. न फुललेले ओंब्यातील लोंब्या लालसर तपकिरी ते गडद तपकिरी होतात. पोटरी अवस्थेच्या सुमारास झालेली लागण सर्वात जास्त नुकसानकारक असते आणि पीकाचे खूप नुकसान करु शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

लिंबुवर्गीय पिके आणि भातापासून वेगळ्या केलेल्या सुडोमोनोज फ्ल्युरेसेन्स सारख्या र्हिबझोबॅक्टेरियाच्या जीवाणूंचा वापर भातावरील पर्णकोष कुजव्यासाठी विषारी आहे, ज्यामुळे घटना कमी होतात आणि उत्पादनही वाढते. भातावरील पर्णकोष कुजव्याचा बायपोलॅरिस झिकोला हा दुसरा संभावित शत्रु आहे जो एस. ऑरिझेची मायसेलियल वाढ पूर्णपणे थांबवितो. टॅजेटेस इरेक्टाच्या फुलांच्या आणि पानाच्या अर्कातील बुरशीविरोधी कामगीरी देखील या एस. ऑरिझेची मायसेलियलच्या नियंत्रणासाठी १००% परिणामकारक आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गंभीर संक्रमणात पोटरी अवस्थेत आणि ओंबी धारणेच्या काळात मँकोझेब, कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा प्रोपिकोनॅझोलसारख्या बुरशीनाशकांचा एका अठवड्याच्या अंतराने वापर केल्यास रोगाच्या घटना कमी होतात असे पाहण्यात आले आहे. लागवडीपूर्वी बीज प्रक्रियेसाठी मँकोझेसारख्या बुरशीनाशकांचा वापर केल्यास चांगले परिणाम आढळून आलेले आहेत.

कशामुळे झाले

पर्णकोष कुजवा हा तत्वत: बियाणेजन्य रोग आहे. सारोक्लाडियम ऑरिझे नावाच्या बुरशीमुळे हा रोग मुख्यतः होतो पण काही वेळा सॅक्रोलॅडियम अॅटेन्युआटम नावाच्या बुरशीमुळे सुद्धा हा रोग झाल्याचे पाहण्यात आले आहे. बुरशी भाताच्या काढणीनंतर राहिलेल्या अवशेषात रहाते आणि पुढच्या हंगामात संक्रमण करते. दाट लागवड आणि ज्या झाडात जखमेच्या रुपात किंवा किड्यांनी ओंबी धारणेच्या सुमारास केलेल्या जखमांनी बुरशीला आत शिरायला जागा मिळते ज्यामुळे या बुरशीचे संक्रमण दिसुन येते. फुटवे येण्याच्या अवस्थेत पालाश, कॅल्शियम सल्फेट किंवा जस्तयुक्त खते दिल्यास खोड आणि पानांच्या पेशी मजबुत होतात आणि जास्त नुकसान टाळले जाते. याचा संबंध इतर विषाणुंच्या संक्रमणाने झाड कमजोर होण्याशीही जोडला जातो. गरम (२०-२८ डिग्री सेल्शियस) आणि दमट (ओलसर) वातावरण रोगाच्या वाढीस अनुकूल असतो.


प्रतिबंधक उपाय

  • शक्य झाल्यास प्रमाणित स्त्रोताकडील निरोगी बियाणे वापरा.
  • लागवडीचे अंतर शक्यतो २५ सें.मी x २५ सें.मी ठेवा.
  • शेतात वर्षानुवर्षे एकच पीक घेणे टाळा, कमीत कमी दोन प्रकारचे पीक लावा.
  • ओंबीवरील कोळ्यासारख्या कीटकांना शोधण्यासाठी नियमितपणे शेताचे निरीक्षण करून त्यांचे नियंत्रण करा.
  • फुटवे येण्याच्या अवस्थेत पालाश, कॅल्शियम सल्फेट किंवा जस्तयुक्त खते द्या.
  • संक्रमित अवशेष आणि तण शेतातुन काढण्यानेही मदत मिळते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा