मका

मक्यावरील दक्षिणीय करपा (पानांवरील ठिपके)

Cochliobolus heterostrophus

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पहिल्यांदा खालच्या पानांवर तपकिरी कडांसकट गव्हाळ, हिऱ्याच्या आकाराचे ते लांबट डाग दिसतात.
  • हे डाग विविध मापाचे असतात आणि ते पानांच्या शिरांपलीकडेपर्यंत वाढतात.
  • संवेदनशील रोपात, ते एकत्र येऊ शकतात ज्यामुळे पानांचा मोठा भाग ग्रासला जाऊ शकतो.
  • रोगाच्या नंतरच्या टप्प्यात कणसावरही राखाडीसर आवरण आणि बेढब रचना दिसु शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

बुरशीचा सशक्तपणा, वाण आणि हवामान परिस्थितीप्रमाणे लक्षणांत थोडा फरक पडु शकतो. पहिल्यांदा खालच्या पानांवर तपकिरी कडांसकट गव्हाळ, हिऱ्याच्या आकाराचे ते लांबट डाग दिसतात आणि नंतर हळुहळु वरील कोवळ्या पानांवरही दिसु लागतात. डाग विविध मापांचे असतात आणि ते पानांच्या शिरापलीकडेपर्यंत वाढतात. संवेदनशील रोपात डाग एकमेकात मिसळु शकतात परिणामी पानांचा मोठा भाग ग्रासला जाऊ शकतो. रोगाच्या पुढील टप्प्यावर कणसाच्या आवरणावरही राखाडीसर आणि बेढब रचना दिसु शकते. पानांना झालेल्या नुकसानामुळे उत्पादकतेत घट होऊन झाड निस्तेज होतात आणि खोड तुटतात. झाडे कोलमडू शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रायकोडर्मा अॅट्रोविरिड एसजी ३४०३ ही स्पर्धात्मक बुरशी बापरुन या बुरशीच्या संक्रमणाविरुद्ध जैविक नियंत्रण यशस्वीरीत्या वापरले गेले. तरीपण, शेतातील चाचणी अजुन करायची बाकी आहे ज्यावरुन शेतात या उपचाराचा प्रभाव किती पडेल हे समजेल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. योग्य वेळेत बुरशीनाशकांचे उपचार केल्यास रोगाला परिणामकारकरीत्या आळा घालता येतो. संभावित उत्पादकतेतील घट, हवामानाचा अंदाज, झाडाच्या वाढीचा टप्पा आणि रोगाची वाढ हे समीकरण सोडवुनच बुरशीनाशकांच्या वापरावर निर्णय घ्या. कोणत्याही जलद परिणाम देणार्‍या, विस्तृत श्रेणीच्या उत्पादांची शिफारस करण्यात येत आहे उदा. मँकोझेब (२.५ ग्रॅ./ली.) पाण्यात मिसळुन ८-१० दिवसांच्या अंतराने वापरावे.

कशामुळे झाले

कोचलियोबोल्युस हेतेरोस्ट्रोफु (ज्याला बायपोलॅरिस मेडिस असेही म्हणतात) या बुरशीमुळे हा रोग होतो. बुरशी झाडाच्या जमिनीतील अवशेषात जगते. जेव्हा हवामान अनुकूल असते, ती बीजाणू बनविते ज्यांचे वहन नविन रोपांवर वारा आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याच्या थेंबांनी होते. बीजाणू पानांवर उगवतात आणि (संक्रमण ते नविन बीजाणू तयार करण्याचे) पूर्ण जीवनचक्र ७२ तासात पूर्ण करतात. बुरशीची वाढ आणि संक्रमण प्रक्रिया यांना दमट हवामान, पानांचा ओलेपणा आणि २२ ते ३० डिग्री सेल्शियसचे तापमान अनुकूल आहे. पानांना झालेल्या नुकसानामुळे रोपांची उत्पादनक्षमता घटते आणि जर लागण मोसमात लवकर झाली तर उत्पादनात मोठी घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • मक्याचे विविध प्रकार लावा ज्यामुळे एकच पीक घेतले जाणार नाही.
  • शेत स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्या.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • पीकाचे अवशेष खोल नांगरुन जमिनीत गाडुन टाका.
  • काढणीनंतर जमिन पडिक ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा