ऊस

ऊसावरील नयनाकृती ठिपके

Bipolaris sacchari

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवातीला पानांच्या दोन्ही बाजुला लालसर ठिपके येतात.
  • नंतर डाग लंबगोलाकार होऊन लाल ते तपकिरी कडा दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

ऊसाच्या पानांना बी. सच्चारीची लागण झाल्यापासुन १-३ दिवसात बारीक लालसर ठिपके पानांच्या दोन्ही बाजुला दिसतात. हे डाग नंतर लंबगोलाकार होऊन त्यांचे लांब अक्ष हे मुख्य शीरांना समांतर असतात. कडा लाल ते तपकिरी होतात. डागांची केंद्र राखाडी किंवा गव्हाळ होतात. डाग एकमेकात मिसळुन लांब पट्टे तयार होतात. गंभीर संक्रमणात ऊसाची कोवळी रोपे करप्यामुळे शेंडे कूज होऊन लागवडीनंतर १२-१४ दिवसातच मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बिपोलॅरिसिस सच्चारीविरुद्ध दुर्दैवाने कोणतीही पर्यायी उपचार पद्धती माहितीत नाही. या रोगाचा सामना करण्यात मदत करणारी कोणतीही पद्धत आपल्याला माहिती असल्यास आपण ती आम्हाला कळवावी अशी विनंती आम्ही आपल्याला करतो. आपल्या उत्तराची अपेक्षा आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर ऑक्झिक्लोराइड ०.२% किंवा मँकोझेब ०.३% यांची २-३ वेळा फवारणी दर १०-१५ दिवसांच्या अंतराने करावी. रोगाच्या गंभीरतेप्रमाणे फवारणी केली जावी.

कशामुळे झाले

नयनाकृती ठिपक्यांचे वहन बीजाणू (कोनिडिया)द्वारे होते जे पानांतील डागात मुबलक प्रमाणात तयार होतात आणि त्यांचे वहन वार्‍याने आणि पावसाने होते. बुरशीच्या बीजाणूंना उगवण्यासाठी जास्त आर्द्रता आणि दव तयार होण्याची परिस्थिती अनुकूल असते. जुन्या पानांपेक्षाही कोवळ्या पानात घर झपाट्याने निर्माण केली जातात. कांड्यांतुन संक्रमण होत नाही. यंत्रांद्वारे आणि मानवी कार्यातुन वहन होत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • बाजारात उपलब्ध असलेल्या वाणातुन प्रतिकारक वाण निवडा.
  • रोग प्रतिबंधित करण्यास हा सर्वात कार्यक्षम मार्ग आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा