ऊस

ऊसावरील मर

Gibberella fujikuroi

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • रोपे अशक्त फिकट दिसतात.
  • वाढ खुंटलेली असते.
  • पेरे गडद लाल ते जांभळट होतात.
  • ऊसाचे खोड पोकळ आणि सुकलेले असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

वाढीच्या काळानंतरच रोग नजरेस पडतो. पाने पिवळसर हिरवी होतात, त्यांतील ताठरपणा जातो आणि अखेरीस बुडापासुन सुरवात होऊन सुकतात. शेंडे पांढरे किंवा मध्यशिर पिवळसर होऊन भवतालची पात फिकट हिरवी होते. संक्रमित ऊस वाढ खुंटलेला असतो, वजनास हलका भरतो आणि सांध्याच्या मधली जागा पोकळ असते पण पेरे आणि कळ्या अबाधित रहातात. उभ्या चिरांतुन गडद लाल ते जांभळा आतला भाग पेराच्या कोंबाच्या थोडा वर दिसतो. बहुतेक वेळा पीक कमीच येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणांना आद्र ५४ डिग्री सेल्शियसच्या गरम हवेत १५० मिनीटे ठेवा. मग बियाणांना ०.१% ब्लीचच्या द्रावणात सुमारे १०-१५ मिनीटे बुडवा. स्वच्छता राखा आणि सुरक्षा चष्मे आणि हातमोज्यांचाही वापर करा. भांडी नंतर घरात वापरु नका.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऊसावरील मर रोगावर कोणतेही रसायनिक उपचार परिणाम करत नाहीत.

कशामुळे झाले

पावसाळ्यात किंवा नंतर रोपांवर लक्षणे दिसतात. रोपांना सोंडकीड, दीडा, स्केल्स, मिली बग्ज वगैरे किड्यांनी केलेल्या जखमांतुन बुरशी मुख्यत्वे आत शिरते. जैविक ताण जसे कि दुष्काळ आणि पाणी भरणे ह्यामुळे मर संक्रमणास रोप संवेदनशील होते. आद्रतेच्या ताणाबरोबर उच्च तापमान आणि कमी आद्रता ह्यामुळे रोप मरगळण्यास प्रतिरोध करु शकत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुनच बियाणे किंवा कलमे घ्या.
  • यजमान नसलेल्या पीकांबरोबरच पीकफेर करण्याची शिफारस करण्यात येते.
  • शेतात खतांचा खास करुन नत्र खतांचा जास्त वापर करु नका.
  • शेतात काम करताना झाडाला इजा होऊ देऊ नका.
  • शेतात पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या आणि जास्त पाणी देऊ नका.
  • पीक घेतल्यानंतर जुन्या रोपांचे अवशेष काढुन व्हिल्हेवाट लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा