ऊस

ऊसावरील अननस रोग

Ceratocystis paradoxa

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पेरांच्या आत क्लोरोटिक दिसते, पहिल्या अठवड्यात बाधीत खोडे पिकलेल्या अननसासारखा वास सोडतात.
  • कोंब हळुहळु सडतात आणि मुळे काम करीत नाहीशी होतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

ऊस

लक्षणे

रोपाला झालेल्या जखमातुन किंवा किड्यांनी केलेच्या जखमातुन बुरशी आत शिरते. मग ती झपाट्याने आतील पेशीत पसरते. ते भाग पहिल्यांदा लाल आणि नंतर तपकिरीसर काळे किंवा काळे होतात. कुजण्याच्या प्रक्रियेमुळे पोकळ्या निर्माण होतात आणि खूप पिकलेल्या अननसासारखा वास सुटतो. वास काही अठवड्यापर्यंत दरवळत रहातो. बाधीत रोपांची मुळे काम करत नाहीत, कळ्या फुलत नाहीत आणि ज्या फुलतात त्या कोलमडतात किंवा वाढ खुंटलेल्या असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

जर पेरणीच्या काळात उशीर झाला तर पेरणीपूर्वी बियाणाला (५१ डिग्री सेल्शियस) गरम पाण्यात ३० मिनीटांसाठी उपचार करा. शेतात ज्या खोडांना कोंब आलेले नसतील त्यांना शोधुन मध्ये चिरुन रोगाची लक्षणे शोधा (कुजणे आणि घाणेरडा वास)

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांचे उपचार आर्थिक दृष्ट्या व्यावहारिक नसतात.

कशामुळे झाले

पेरणी केल्यानंतर पहिल्या काही अठवड्यातच उपद्रव निर्माण होतो. बुरशीची बीजांडे वार्‍याने, पाण्याने आणि सिंचनाच्या पाण्यानेसुद्धा पसरतात. किडे खासकरुन बीटल्स बीजांडांचे वहन करुन झाडांना चावताना आत सोडतात. बीजांडे जमिनीत किमान एक वर्षापर्यंत जगु शकतात. बाधीत रोपात बुरशी पुष्कळ महिन्यांपर्यंत जीवंत राहू शकते. पाऊस पडल्यानंतर पाणी साचलेल्या जागी ह्या रोगाची संवेदनशीलता जास्त असते. सुमारे २८ डिग्री सेल्शियसचे तापमान बीजांडे निर्माण होण्यास आणि बुरशीच्या वाढीस फारच अनुकूल असते. लांबलेले दुष्काळही ऊसास ह्या जंतुंसाठी संवेदनशील करतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिरोधक वाण लावा.
  • निरोगी रोपे जी किमान ३ पेरे लांब असतात त्यांचा वापर करा.
  • पेरणी केल्यानंतर झपाट्याने कोंब वाढणारे प्रकार निवडा.
  • शेतातुन पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या.
  • अतिशय विपरीत हवामान टाळण्यासाठी पेरणी काळजीपूर्वक योजना करुन करा.
  • बाधीत पीकांचे अवशेष जाळुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा