लिंबूवर्गीय

सेप्टोरियाचे ठिपके

Septoria citri

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बारीक फिकट गव्हाळ रंगाचे अरुंद हिरव्या कडा असलेले खड्डे फळांवर येतात, जे नंतर लालसर तपकिरी होतात आणि त्यावर खूप दाट काळे ठिपके दिसतात.
  • पानांवर थोडे उंचवटलेले फोडासारखे डाग पिवळ्या कडांसह दिसतात.
  • पानावरील डागांची केंद्र करपतात आणि फिकट तपकिरी होतात.
  • झाडातील खालच्या भागात पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

फळांवर बारीक, खोलगट भाग किंवा खड्डे (१-२ मि.मी. व्यासाचे) दिसतात, जे नंतर सालीपेक्षाही खोल होतात. खड्डे सुरवातीला फिकट गव्हाळ रंगाचे असुन त्यांना अरुंद हिरवी कडा असते, जी परिपक्वतेच्या काळात लालसर तपकिरी होते. डाग एकमेकांत मिसळुन मोठे अनियमित तपकिरी ते काळे खोलगट भाग तयार होतात. या डागांत खूप दाट काळे ठिपके तयार होतात, जे बुरशीचे बीजाणू असतात. गंभीर संक्रमणात प्रभावित फळात वैशिष्ट्यपूर्ण वास असतो आणि ती अकाली गळतात. पानांवरील लक्षणे थोडे उंचावटलेले फोडासारखे काळे डाग (१-४ मि. मी. व्यासाचे) ज्यांच्या कडा पिवळ्या असतात. काही काळानंतर या डागांचे केंद्र करपट होऊन फिकट तपकिरी होते. अनुकूल हवामानात या रोगामुळे झाडातील खालच्या भागात खूप पानगळ होते. जशी पाने गळतात, त्यावरील डाग गडद तपकिरी होतात आणि कडा देखील गडद होतात. बारीक काळे बीजाणू या डागात तयार होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

कॉपर आणि झिंक सल्फेटवर आधारीत सेंद्रिय बुरशीनाशके सेप्टोरिया सिट्रीचा परिणामकारकरीतीने नायनाट करतात. त्यांचा वापर थंडीतील पावसाच्याआधी आणि गरज पडल्यास थंडीत आणि वसंत ऋतुच्या सुरवातीला आणखीन एक फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. परिणामकारकरीत्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशके शरद ऋतुतील पावसाआधी वापरा. अॅझॉक्झिस्ट्रोबिनबरोबर कॉपर मिश्रणे देखील समाधानकारक परिणाम देतात. थंडीतील पावसाआधी फवारणी करा आणि गरज पडल्यास थंडीत आणि वसंत ऋतुच्या सुरवातीला आणखीन एक फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

कशामुळे झाले

ही बुरशी संक्रमित फांद्या, वाळलेले भाग, पान आणि पालापाचोळ्यात जिवंत रहातात. बीजाणू निरोगी पानांफळांवर उडणार्‍या पाण्याने पसरतात. फळे हिरवी असताना उन्हाळ्यात उशीरा किंवा शरद ऋतुत थंड आर्द्र वातावरणानंतर लागण होते. साधारणतः ठंडी व भरपूर वारा असणार्‍या हवामानात फळ पिकतात म्हणून ५-६ महिन्यांनंतर लक्षणे विकसित होईपर्यंत बुरशी फळांमध्ये सुप्त राहते. सेप्टोरियाचे डाग बहुधा ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो त्या वर्षी जास्त गंभीर असतात. कमी किंवा झपाट्याने बदलणार्‍या तापमानात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील आणि कमी काटे असणाऱ्या वाणांची लागवड करा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी छाटणी करा.
  • पाणी उडण्याने रोग पसरण्यास प्रतिबंध करण्यासाठी तुषार सिंचन पद्धत टाळा.
  • शक्य असल्यास बागेला गोठलेल्या दवापासुन वाचविण्यासाठी उपाय करा.
  • गळलेला पालापाचोळा आणि फळे जमा करुन नष्ट करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • झाडांची नियमितपणे खासकरुन संक्रमित फांद्या आणि वाळलेल्या भागांची छाटणी करा.
  • काढणी लवकर घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा