तूर

तुरीच्या खोडावरील बुरशीजन्य करपा

Phytophthora drechsleri f. sp. cajani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पाणी शोषल्यासारखे डाग उमटतात.
  • खोड आणि देठावर तपकिरी ते काळे खोलगट भाग येतात.
  • संक्रमित कोवळ्या रोपांची तातडीने मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

तूर

लक्षणे

कोवळ्या रोपाला लागण झाली असता रोप कोलमडते (तातडीने मर होते). जर रोप मर झाली नाही तर खोडावर गाठी विकसित होतात. संक्रमित कोवळ्या रोपांच्या पानांवर पाणी शोषल्यासारखे डाग उमटतात. खोड आणि देठांवर तपकिरी ते काळ्या रंगाचे खोलगट झालेले डाग येतात. खोडावरील डागाच्या वरचा भाग मरगळतो आणि अखेरीस वाळतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

स्यूडोमोनास फ्लोरेसेन्स आणि बॅसिलस सबलिटिस तसेच ट्रायकोडर्मा व्हिराइड आणि हॅमॅटम हे खोडकुजच्या विरूद्ध प्रभावी आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फयटोफथोरा करप्याच्या नियंत्रणासाठी आपण मेटालेक्झील ४ ग्राम प्रति किलो बियाणे चि बिज प्रक्रिया करू शकता.

कशामुळे झाले

फयटोफथोरा द्रेक्सलेरी नावाच्या जमिनीत रहाणार्‍या बुरशीमुळे लक्षणे उद्धवतात. ही झाडांच्या अवशेषात सुप्तावस्थेत रहाते. दमट हवामान जसे हलका पाऊस आणि २५ डिग्री सेल्शियसचे तापमान लागणीला अनुकूल असते. पाने ८ तास ओली रहाणे हे लागण होण्यासाठी गरजेचे असते. तूर काही काळानंतर या रोगास प्रतिरोध निर्माण करतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • जिथे पाणी साचत असेल किंवा खोलगट भागात गादी वाफ्यांवर लागवड करा.
  • करप्याचा पूर्व इतिहास असलेल्या भागात तुरीची लागवड टाळा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • पीक फेरपालट करा.
  • मुग किंवा उडीद सारख्या पिकांसोबत आंतरपीक किंवा अच्छादन पीक केल्यास करप्याची संक्रमणाची जोखीम कमी राहील.
  • पालाशयुक्त खतांचा वापर करून संक्रमणाची जोखीम कमी करता येते.
  • यजमान नसणार्‍या पिकांसह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा