गुलाब

काळे ठिपके

Diplocarpon rosae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • छोटे ठिपके पानांच्या वरच्या बाजुला येतात.
  • सभोवताली पिवळी प्रभावळ असते.
  • अकाली पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
गुलाब

गुलाब

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजुला काळे ठिपके दिसणे असे लक्षणांचे वर्णन केले जाते. हे जांभळट किंवा काळे धब्बे झपाट्याने वाढुन २ ते १२ मि.मी. होतात आणि कडा पसरलेल्या असतात. पानांचा सभोवतालचा भाग पिवळा पडुन अकाली गळते. काहीवेळा छोटे, काळे, खवल्यांसारखे धब्बे कोवळ्या फांद्यांवर उमटतात. गंभीर संक्रमण झाल्यास झाडाची बहुतेक सर्व पाने गळतात आणि फुलेही कमी लागतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

काळ्या ठिपक्यांचे नियंत्रण करण्यासाठी खालील घटकांची शिफारस केली जाते: कॉपर, लाईम सल्फर, नीम तेल, पोटॅशियम बायकार्बोनेट. बेकिंग सोडा (सोडियम बायकार्बोनेट)चाही वापर केला जाऊ शकतो: १ चमचा (५ मि.ली.) ह्यात १ ली. पाणी + द्रव साबणाचा एक थेंब. जीवाणू, बॅसिलस सबटिलिस असणारे द्रावणही उपलब्ध आहे. ट्रयकोडर्मा हर्झानियमच्या संयुगात बुरशीनाशके वापरल्यानेही चांगले नियंत्रण मिळते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. काळ्या ठिपक्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी टेब्युकोनाझोल, टेब्युकोनाझोल + ट्रायफ्लॉक्जीस्ट्रोबिन आणि ट्रिटिकोनाझोल असणार्‍या बुरशीनाशकांची शिफारस केली जाते.

कशामुळे झाले

डिप्लोकार्पोन रोझे नावाच्या बुरशीमुळे गुलाबाच्या झाडावर काळे ठिपके येतात. ही बुरशी गळलेल्या आणि कूजत असलेल्या पानात आणि फांद्यांत विश्रांती घेते. बीजाणूंचा प्रसार वार्‍याने आणि पावसाच्या थेंबांद्वारे होतो, ज्यामुळे वसंत ऋतुत उमलणार्‍या पानांवर संक्रमण होते. बुरशीची गंभीरता पावसाळ्यात जास्त असते जेव्हा तापमान २०-२६ अंश असुन परिस्थिती ओली आर्द्र असते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगमुक्त लागवड सामग्री वापरा.
  • नविन किंवा जुन्या प्रजातींची, कमी संवेदनशील वाणे लावा.
  • लागवडीची जागा भरपूर उन्हे असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, हवा चांगली खेळणारी असावी आणि झाडांमध्ये १-१.२५ मी.
  • अंतर सोडा.
  • जमिनीत एक थर मुल्च (पाल्यापाचोळ्याचे आच्छादन) करा.
  • छाटणी नियमित करा आणि छाटणी करताना कमकुवत किंवा मृत फांद्या काढा.
  • गुलाबांभोवतालच्या जमिनीत सकाळी पाणी द्या.
  • गळलेली पाने गोळा करुन नष्ट करा किंवा मुल्चखाली गाडा.
  • प्रभावित फांद्या नविन पाने येण्यापूर्वीच छाटा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा