मका

मक्याच्या पानावर येणारे राखाडी ठिपके

Cercospora zeae-maydis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • खालच्या पानांवर बारीक, तपकिरी किंवा गव्हाळ रंगाचे पिवळी तपकिरी प्रभावळ असलेले ठिपके बहुधा फुलधारणेच्या आधी येतात.
  • हे ठिपके कालांतराने राखाडीसर आणि वाढीव आयताकृती चर्‍यात बदलतात जे पानाच्या शिरांना समांतर वाढतात.
  • अनुकूल परिस्थितीत ते एकमेकांत मिसळतात आणि पूर्ण पान ग्रासतात ज्यामुळे झाडे कोलमडतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

खालच्या पानांवर बारीक, तपकिरी किंवा गव्हाळ रंगाचे पिवळी तपकिरी प्रभावळ असलेले ठिपके बहुधा फुलधारणेच्या आधी येतात. हे ठिपके कालांतराने राखाडीसर होतात आणि कोवळ्या पानांवरही दिसु लागतात. जसजसा रोग वाढतो, हे डाग मोठे होतात आणि आयताकृती चरात बदलतात जे पानांच्या शिरांना समांतर वाढतात. अनुकूल परिस्थितीत (उबदार तापमान, उच्च आर्द्रता आणि ओली पाने) ते वाढुन एकमेकांत मिसळतात आणि पूर्ण पान ग्रासतात. जर हे दाणे भरण्याआधी घडले तर पीकाचे मोठे नुकसान होते. पानांच्या रोगामुळे झाडे कमजोर होतात आणि काही वेळा खोड मऊ पडून कोलमडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैव उपचार उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांच्या फवारणीद्वारे उपचार हे वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यात आढळल्यास रोगाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग आहे परंतु हवामान, संभाव्य उत्पन्नाचे नुकसान आणि झाडाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मगच करायला हवे. बुरशीनाशके ज्यात पायराक्लोस्ट्रोबिन आणि स्ट्रोबिल्युरिन आहेत किंवा अॅझोक्सीस्ट्रोबिन आणि प्रोपिकोनॅझोल, प्रोपिकोनॅझोल आणि ट्रायफ्लोक्सीस्ट्रोबिनची संयुगे आहेत, ते बुरशीच्या नियंत्रणाचे काम चांगले करतात.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा झेयाई मेडिस नावाच्या बुरशीमुळे पानांवरील राखाडी ठिपके हा रोग उद्भवतो. ही झाडाच्या जमिनीतील अवशेषात खूप काळापर्यंत जगते. वसंत ऋतुमध्ये पावसाच्या उडणार्‍या थेंबांनी आणि वार्‍याने हिचे बीजाणू खालच्या पानांवर पोचतात. बुरशीच्या जीवनचक्राला वाढीव तापमान (२५ ते ३० डिग्री सेल्शियस), उच्च आर्द्रता (दव, धुके) आणि पाने फार काळ ओली रहाणे फार मानवते. गरम, कोरडे हवामान यांच्या विकसनात बाधा आणतात. विविध वाणांमध्ये लक्षणे थोडी फार बदलतात. बुरशीचे जीवनचक्र संवेदनशील वाणात (संक्रमण ते नविन बीजाणू तयार करणे) १४-२१ दिवसांचे आणि प्रतिकारक वाणात २१-२८ दिवसांचे असते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • रोपांना प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी उशीरा लागवड करा.
  • शेतात हवा चांगली खेळती ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरुन झाडाचे सर्व अवशेष पुरुन टाका.
  • जास्त कालावधीसाठी यजमान नसणार्‍या पीकाबरोबर पीक फेरपालट योजना करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा