सोयाबीन

सोयाबीनचा तांबेरा

Phakopsora pachyrhizi

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुने आणि शिरांबरोबर बारीक, राखाडी ठिपके येतात.
  • राखाडी ठिपके नंतर लालसर ते तपकिरी होतात.
  • ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी रंगहीनता दिसुन येते.
  • संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यात सर्व पानांवर लक्षणे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

झाडाच्या खालच्या भागात संक्रमण सुरु होऊन नंतर वर चढते. प्राथमिक लक्षणे आहेत फुलधारणेच्या सुमारास पानांच्या खालच्या बाजुला आणि शिरांना समांतर बारीक राखाडी ठिपके उमटतात. कालांतराने हे ठिपके आकाराने आणि संख्येने वाढुन एकमेकांत मिसळतात आणि लालसर तपकिरी किंवा काळे पडतात. जसजसा रोग वाढतो तसतसे त्यावर उंचवटलेले, फिकट तपकिरी बुरशीचे फोड येतात जे सहज पाहता येतात. त्यातील काही एकमेकात मिसळतात आणि पिवळ्या प्रभावळीसकट गडद तपकिरी धब्बे तयार होतात. आता ते पानांच्या दोन्ही बाजुला, काही वेळेस देठांवर आणि खोडावरही दिसतात. रोपांची पानगळ अकालीच होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

कोरिम्बिया सिट्रियोडोरिया १%, सिम्बोपोगोन नारुडस ०.५%, आणि थिमस व्हल्गॅरिस ०.३% यांचे अर्क तेले असणारे उत्पाद वापरुन संक्रमणाची गंभीरता कमी करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. योग्य बुरशीनाशक निवडणे आणि योग्य वेळी त्याचा वापर करणे हे फार महत्वाचे आहे. हेक्झाकोनाझोल (२ मि.ली./१ ली. पाणी) आणि प्रॉपिकोनाझोल (१ मि.ली./१ली. पाणी) वर अधारीत बुरशीनाशके वापरा. झिंक आयनमॅनेब काँप्लेक्सच्या द्रावणांना वाढीच्या काळादरम्यान अधुनमधुन वापरा.

कशामुळे झाले

सोयाबीनचा तांबेरा हा आक्रमक रोग असुन फाकोस्पोरा पॅचिर्‍हिझी नावाच्या बुरशीमुळे उद्भवतो. हा बियाणेजन्य रोग नसल्याने याला जिवंत रोपांच्या भागांशिवाय आपले जीवनचक्र पूर्ण करता येत नाही. जर सोयाबीनची रोपे आजुबाजुला नसतील तर याला जिवंत रहाण्यासाठी पर्यायी यजमानांची गरज असते. फोडात तयार झालेले बीजाणू एका रोपावरुन दुसर्‍या रोपावर उडुन थेट रोपाच्या पेशीत प्रवेश करतात व त्यांना नैसर्गिक छिद्रे किंवा जखमांची वगैरे गरज लागत नाही. ह्या रोगाच्या विकासासाठी सलग ६ ते १२ तास पाने ओली रहाणे, मध्यम ते थंड तापमान (१५ ते २५ डिग्री सेल्शियस) आणि उच्च आर्द्रता (>७५%) अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण निवडा.
  • लवकर पेरणी करा आणि शक्य झाल्यास लवकर तयार होणारे वाण लावा.
  • किंवा कोरड्या काळाचा लाभ घेण्यासाठी उशीरा लागवड करा.
  • पीकाची झाडी लवकर वाळण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • पिकाचे नियमित निरीक्षण करा आणि पर्यायी यजमान असणार्‍या झाडांना काढुन टाका.
  • जमिनीची सुपीकता, विशेषत: स्फुरद आणि पालाशचे स्तर संयोजित करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा