ज्वारी

पानांवरील अँथ्रॅकनोज करपा व खोडकुज

Colletotrichum graminicola

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बारीक अंडाकृती पाणी शोषल्यासारखे व्रण पानांवर येतात.
  • जांभळट कडा आणि तपकिरी केंद्र असलेले डाग.
  • करप्याचे धब्बे पूर्ण पान व्यापतात.
  • शेंडेमर किंवा खोडकुज होते.

मध्ये देखील मिळू शकते


ज्वारी

लक्षणे

झाडाचे प्रकार, वातावरण परिस्थिती आणि बुरशीची ताकद यावर संक्रमणाचा परिणाम अवलंबुन आहे. संवेदनशील वाणात संक्रमणाचे वैशिष्ट्य तीन विशेष टप्प्यात दिसते: पानावरील ठिपके, शेंडेमर आणि खोडकुज. प्रथमत: बारीक अंडाकृती पाणी शोषल्यासारखे ठिपके खालच्या पानांवर, टोकाकडे किंवा मध्यशीरे जवळ दिसतात व नंतर वरच्या पानांवर दिसतात. ते कालांतराने अर्धपारदर्शक होऊन गव्हाळ केंद्र आणि जांभळट कडा असलेल्या डागत बदलतात व नंतर एकमेकांत मिसळून करप्यांचे धब्बे संपूर्ण पानाभर पसरतात. झाडाच्या वाढीच्या नंतरच्या काळात, जर हवामान अनुकूल असेल तर मृत पेशींवर गडद, उंचावलेले ठिपके दिसतात. खोडाला आणि फांद्यांना झालेल्या जखमांमुळे आतील पेशीत बुरशी घर करते ज्यामुळे इतर लक्षणे जसे शेंडेमर आणि खोडकुज दिसुन येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

कोलेटोट्रिचम ग्रामिनिकोलाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार आमच्या माहितीत नाहीत. जर आपणांस या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजपर्यंत तरी या रोगाविरुद्ध कोणतेही परिणामकारक बुरशीनाशके उपलब्ध नाहीत.

कशामुळे झाले

बुरशी जमिनीतील झाडांच्या अवशेषात रहाते व तिथुन वसंतऋतुमध्ये ती खालच्या पानांवर वारा आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने पसरते. जे डाग पानाच्या पात्यांवर येतात ते खोडाला आणि झाडाच्या वरच्या भागाला दुय्यम लागण करवितात. खोडाला झालेल्या जखमांमुळे आतील भागात लागण होण्याची शक्यता वाढते. जर हवामान अनुकूल असेल तर अखेरीस इतर लक्षणे जसे कि शेंडेमर आणि खोडकुजही दिसतात. बुरशीच्या (आणि रोगाच्या) जीवनक्रमास उष्ण तापमान (२० ते ३० डिग्री सेल्शियस), जास्त काळासाठी उच्च सापेक्ष आर्द्रता आणि वारंवार पाऊस अनुकूल असतो. बुरशी रोपावस्थेत संक्रमण करू शकते पण योग्य खते वापरली असतील तर उत्पादनात मोठी घट होते नाही. झपाट्याने वाढणाऱ्या पानांवर लक्षणे कमी विकसित होताना दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • अधिक कालावधीसाठी यजमान नसणार्‍या पीकांबरोबर (गवतवर्गीय नसलेली पीके किंवा सोयाबीन) पीक फेरपालट करण्याची योजना करा.
  • शेतात लक्षणांसाठी उदा.खोडकुज, निरीक्षण करा.
  • जमिनीचा कस संतुलित राखा आणि सामू स्थिर ठेवा.
  • पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण काढून टाका.
  • पीक घेतल्यानंतर झाडाचे अवशेष खोल नांगरुन गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा