केळी

केळी पिकावरील कवडी रोग

Colletotrichum musae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फळांवर गडद तपकिरी ते काळे दबलेले डाग दिसतात.
  • मोठ्या धब्ब्यात विकसित होतात.
  • नारिंगी ते फिकट गुलाबी रंगाची बुरशी ह्या डागाच्या केंद्रात दिसते.
  • फळे अकाली पक्व होतात आणि सडणे होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

संक्रमित फळाच्या सालीवर गडद तपकिरी ते काळे दबलेले डाग दिसतात. सुरवातीची लक्षणे हिरव्या फळांवर दिसतात आणि त्यांचे वैशिष्ट्य आहे गडद तपकिरी ते काळे, डोळ्यातील बाहुल्यांच्या आकाराचे, दबलेले व फिकट कडा असलेले डाग सालीवर येतात. पिवळ्या पडणार्‍या फळांवर, हे डाग वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि नंतर एकत्र येऊन मोठे काळे दबलेले धब्बे बनतात. नारिंगी ते फिकट गुलाबी रंगाची बुरशी त्या डागांच्या मध्यावर दिसते. फुलांना आधीच्या संसर्गाच्या परिणामाने ही लक्षणे फळांच्या टोकावरही सुरु होऊ शकतात. संक्रमित फळे अकालीच पिकतात, आणि संसर्गामुळे गर वाढीव दराने सडु लागतो. काही वेळा पहिली लक्षणे घड उतरविल्यानंतरही खूप वेळाने म्हणजे वाहतूकीच्या वेळी किंवा साठवणीत असताना सुद्धा दिसु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

काढणीच्या वेळी फळांवर उपचारासाठी जैवबुरशीनाशक जे १०% अरेबिक गमवर आधारीत आहे, त्याच्या बरोबर १.०% किटोसॅन (कयटिनपासुन बनविलेले) वापरल्यास साठवणीच्या वेळी ह्या रोगावर अंशत: नियंत्रण मिळवता येते असे निदर्शनात आले आहे. बुरशीची वाढ टाळण्यासाठी बर्‍याचशा झाडांच्या अर्काचे मिश्रण वापरुन थोडे यश मिळाले आहे ज्यात सिट्रिक अर्क, झिन्गिबर ऑफिशिनेल रयझोम अर्क तसेच अॅकाशिया अलबिडा, पॉलियाल्थिया लाँगीफोलिया आणि क्लेरोडेन्ड्रम इनर्मे पानांचे अर्कही येतात. ही आशेचे किरण दाखविणारी माहिती अजुनही शेतातील प्रयोगांद्वारे सिद्ध व्हायचे बाकी आहेत. हिरव्या फळांना गरम पाण्यात ५५ डिग्री सेल्शियसच्या तापमानात २ मिनिटांसाठी बुडवुन ठेवल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

रासायनिक नियंत्रण

लागवडीच्या वेळेस रोपांवर मँन्कोझेब (०.२५%) किंवा बेन्झिमिडाझोल(०.०५%) असणाऱ्या उत्पादांची फवारणी करावी आणि नंतर कोणताही संसर्ग होऊ नये म्हणुन आवरण घालून ठेवावे. उतरविलेल्या घडातील फळ बेन्झिमिडाझोल असणाऱ्या बुरशीनाशकात बुडवुन काढावे किंवा त्याची फवारणी करावी. खाद्य स्तराच्या फळांवर ब्युटिलेटेड हायड्रोक्झिानिसोल (बीएचए)चा लेप दिल्यास ही बुरशीनाशके चांगले काम करण्याचा संभव असतो.

कशामुळे झाले

अँन्थ्रॅकनोस कोलेटोट्रायकम म्युसे नावाच्या बुरशीमुळे होतो जी मृत वा सडणाऱ्या पानांमध्ये आणि फळांतही जगते. त्यांचे बीजाणू हवा, पाणी आणि किड्यांमुळे तसेच पक्षी आणि उंदीर जे केळी खातात त्यांच्याद्वारे पसरतात. हे बीजाणू फळात सालीतील छोट्याश्या इजेतुन शिरतात आणि नंतर प्रजोत्पादन करुन लक्षणांची अभिव्यक्ती सुरु करतात. वाढलेले तापमान, उच्च आर्द्रता आणि वारंवार पडणारा पाऊस हे संसर्गासाठी अनुकूल वातावरण आहे. लक्षणे पिकणाऱ्या, झाडावरील फळांच्या घडावर किंवा घड उतरविल्यानंतर साठवणीच्या वेळीही विकसित होऊ शकतात. वाहतुक आणि साठवणीदरम्यान केळीची गुणवत्ता प्रभावित करणारा हा मुख्य रोग आहे.


प्रतिबंधक उपाय

  • काढणी, साठवण आणि पॅक करते वेळेस केळीच्या घडाला इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • घड तयार झाल्यानंतर त्याला संसर्गापासुन वाचविण्यासाठी प्लास्टिकच्या आवरणाने झाकुन ठेवा.
  • प्रक्रियेची आणि साठवणीची जागा पीक घेतल्यानंतर संसर्गापासुन वाचविण्यासाठी स्वच्छ करुन घ्या.
  • सालीवरील बुरशीचे बीजाणू काढण्यासाठी फळांना काढणी नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
  • कुजलेले पान व फुलांचे राहीलेले अवशेष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा