पपई

पपयीवरील पावडरीसारखी बुरशी (मिल्ड्यु)

Oidium caricae-papayae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाणी शोषल्यासारखे डागांबरोबर पांढुरके आवरण पानाच्या खालच्या बाजुला दिसते.
  • पिवळ्या किनारींचे फिकट हिरवे ते तपकिरी डाग काही वेळा पानांच्या वरच्या बाजुला दिसतात.
  • सफेद बुरशीचे डाग कच्च्या फळांवर दिसतात.
  • जास्त बाधीत पाने नंतर सुकतात आणि त्यांची आतल्या बाजुला गुंडाळी होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

पपई

लक्षणे

पाणी शोषल्यासारखे डाग पांढुरक्या पावडरी बुरशीने आच्छादिले जातात ते पहिल्यांदा पानांच्या खालच्या बाजुला पुष्कळदा पानांच्या शिरांच्या बाजुला, पानांच्या देठांजवळ आणि फुलांच्या मुळाशी दिसतात. कधी कधी फिकट हिरवे ते पिवळे डाग पानांच्या वरच्या बाजुलाही दिसतात, काही वेळा ते पांढर्‍या बुरशीने आच्छादिलेलेही असतात. हे डाग नंतर नेक्रोटिक तपकिरी होतात आणि पिवळी किनार असते. जास्त बाधीत पाने नंतर सुकतात आणि आतल्या बाजुला गुंडाळली जातात. फळांवर विविध आकाराचे पांढर्‍या बुरशीने आच्छादिलेले डाग दिसतात. संसर्ग बहुधा जुन्या फळे येणार्‍या झाडांना होतो. तरीपण कोवळ्या रोपांतही हा संसर्ग वाढणार्‍या भागांना मारु शकतो, पानगळती होऊ शकते, देठ आणि फळांवर व्रण येतात आणि महत्वाचे म्हणजे पिकाचे नुकसान होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

पाण्यात विरघळणारा सल्फर, सल्फरची पावडर किंवा लाईम सल्फर तसेच पोटॅशियम बायकार्बोनेट ह्या रोगाचे नियंत्रण करण्यात मदतकारक ठरले आहेत. तरीपण जर गरम तापमानात यांचा वापर केला गेल्यास हे उपचार रोपांसाठी विषारी ठरु शकतात. काही वेळा बेकिंग पावडर, नीम तेलाचा अर्क आणि साबणाचे द्रावण फायदेशीर ठरु शकते. सगळ्या बाबतीत जर रोग गंभीर असेल तर हे उपचार जास्त परिणामकारक ठरत नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅझॉक्सि्ट्रोबिन, बेनोमिल, कार्बेंधाझिम किंवा मँकोझेबसारख्या बुरशीनाशकांचा वापर पपयांवरील पावडरीसारख्या बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

ऑइडियम कॅरिके पपये नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. बुरशी फक्त पपयाच्या रोपांनाच बाधीत करते आणि पुनरुत्पादन करते. बीजांडे दुसर्‍या रोपांवर आणि शेतात वार्‍याद्वारे पसरतात. पानांच्या कोणत्याही वाढीच्या टप्प्यावर हा संसर्ग होऊ शकतो पण जुनी पाने जास्त संवेदनशील असतात. रोपाच्या त्वचेच्या पेशीत ही बुरशी वस्ती करते ज्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. कमी सुर्यप्रकाश, उच्च पातळीची आद्रता, मध्यम तापमान (१८ ते ३२ डिग्री सेल्शियस) आणि १५०० ते २५०० मि.मी. दरवर्षी पडणारा पाऊस रोगाची वाढ आणि लक्षणांची गंभीरता वाढविते.


प्रतिबंधक उपाय

  • जास्त लवचिक प्रकारची बियाणे वापरा.
  • रोपे चांगल्या हवेशीर जागी आणि दोन रोपांत भरपूर जागा सोडुन लावा.
  • उच्च आद्रता असलेली जागा आणि २४ डिग्री सेंटिग्रेडखाली तापमान असल्यास झाडे लावण्याचे टाळा.
  • उंचावरुन सिंचन करु नका.
  • रोपांना सकाळी लवकर पाणी द्या.
  • पाणी रोपांच्या मुळाशी द्या.
  • संतुलित पोषण देण्याची खात्री ठेवा आणि उच्च नायट्रोजन असणारे खत टाळा.
  • रोपाचे बाधीत भाग काढुन रोपाचे अवशेष नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा