तूर

शेंगवर्गीय पिकातील सर्कोस्पोरा पानावरील ठिपके

Cercospora canescens

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • लालसर तपकिरी कडांनी वेढलेले बारीक, फिकट तपकिरी करपट वर्तुळाकार ठिपके येतात.
  • हिरव्या शेंगा आणि फांद्यांवर देखील ठिपके दिसतात.
  • खूप पानगळ होते.
  • उत्पादनात घट होते.

मध्ये देखील मिळू शकते


तूर

लक्षणे

जंतुंची संख्या आणि झाडाच्या प्रकाराप्रमाणे लक्षणे किंचित बदलु शकतात. बारीक पाणी शोषल्यासारखे, तपकिरी केंद्र आणि पिवळी प्रभावळ असलेले वर्तुळाकार ठिपके पेरणीनंतर ३-५ अठवड्यांनी पानांवर पहिल्यांदा दिसतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यात, ठिपके संख्येने वाढत जातात आणि लालसर तपकिरी कडासह ज्या थोड्या प्रमाणात दबल्यासारख्या असतात, करपट (गडद तपकिरी)डाग दिसून येतात. रोपाच्या इतर भागात खासकरुन हिरव्या शेंगांच्या पृष्ठभागावर आणि आत देखील ते उमटतात. अनुकूल हवामान परिस्थितीत, फुल आणी शेंगधारणेच्या काळात पानांवरील खूप डागांमुळे खूप पानगळ होते. बुरशी शेंगांच्या बाहेर आणि आत देखील शिरून त्यांना पूर्णपणे नष्ट करते आणि काही वेळा उत्पादनात १००% हानी होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणांवरील गरम पाण्याचे उपचार शक्य आहेत. निंबोळी तेलाचा अर्क रोगाची गंभीरता कमी करण्यासाठी (जास्त संख्येने शेंगा आणि दाणे, सुदृढ शेंगा, जास्त वजन) परिणामकारक आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर बुरशीनाशकांच्या उपचारांची गरज भासलीच तर मँकोझेब असणारे , क्लोरोथॅलोनिल १ ग्रॅ./ली. किवा थियोफेनेट मिथाइल १ मि.ली. दराने, हे उत्पाद १० दिवसाच्या अतराने दोनदा वापरा.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा कॅनेसेन्स नावाच्या बुरशीमुळे पानांवरील ठिपक्यांचा रोग होतो, जी उडीद आणि मुग दोन्हीला संक्रमित करते. बुरशी बियाणात रहाते आणि २ वर्षा पेक्षा जास्त काळ जमिनीतील झाडांच्या अवशेषात जगु शकते. मूळ प्रणालीचा मागोवा घेत ती जमिनीच्या आत खूप अंतरावर जाऊ शकते. ती पर्यायी यजमानानांवर किंवा शेतातील स्वयंभू रोपांवर देखील फोफावते. झाडाच्या खालच्या भागातील प्रसार उडणार्‍या पाण्याचे थेंब आणि वार्‍याने होतो. दिवस आणि रात्रीचे वाढीव तापमान, ओलसर जमिन, उच्च आर्द्रता किंवा भारी वादळी पाऊस या बुरशीच्या प्रसारास अनुकूल आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • जमिनीतुन पाण्याचा निचरा चांगला होण्याची काळजी घ्या.
  • निरोगी झाडापासुन धरलेले किंवा प्रमाणित रोगमुक्त स्त्रोताकडुन घेतलेले बियाणे वापरा.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • फुलांच्या रचनेला नुकसान टाळण्यासाठी उशीरा लागवड करा.
  • ओळीत रोगाचे संक्रमण टाळण्यासाठी उंच वाढणारे तृणधान्य सोबत अंतरपीक घ्या.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • बुरशी खालच्या पानांवर चढु नये म्हणुन पालापाचोळा झाडाखाली पसरा.
  • शेतातुन झाडांचे अवशेष काढुन जाळण्यासारख्या शेतीच्या चांगल्या सवयी वागवा.
  • दूषित हत्यारे साफ करा.
  • झाडे ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • यजमान नसलेल्या पीकांबरोबर पीक फेरपालट करण्याची शिफारस करण्यात येते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा