गहू

पिवळ्या रेषांचा तांबेरा

Puccinia striiformis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • एका अरुंद रेषेत बारीक तांबट पुटकुळ्या दिसतात.
  • खोड आणि ओंबीही प्रभावित होऊ शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

गहू

लक्षणे

झाडाच्या संवेदनशीलतेवर या रोगाची गंभीरता अवलंबुन आहे. संवेदनशील रोपात छोट्या पिवळ्या ते नारिंगी ("तांबट") पुटकुळ्या पानातील शिरांच्या समांतर एका अरुंद रेषेत येतात. त्या अखेरीस एकमेकांत मिसळतात आणि पूर्ण पान ग्रासतात, ही लक्षणे कोवळ्या रोपात लवकर दिसतात. हे फोड (०.५ ते १ मि.मी. व्यासाचे) काही वेळेस खोड आणि ओंबीवरही दिसतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यात पानांवर लांब, करपट, फिकट तपकिरी पट्टे किंवा धब्बे दिसतात जे बहुधा तांबट पुटकुळ्यांनी भरलेले असतात. गंभीर संक्रमणात झाडाची वाढ चांगलीच खुंटते आणि पेशींना नुकसान होते. पानांचा भाग कमी झाल्याने उत्पादन कमी होते, ओंब्या कमी येतात आणि दर ओंबीत दाणेही कमी भरतात. एकूणच, या रोगामुळे उत्पादनात गंभीर नुकसान होऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बाजारात बरीच जैविक बुरशीनाशके उपलब्ध आहेत. बॅसिलस प्युमिलसवर आधारीत उत्पाद ७-१४ दिवसांच्या अंतराने वापरल्यास या बुरशी विरुद्ध परिणामकारक असतात आणि यांचे विपणन उद्योगातील मोठ्या कंपन्या करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. स्ट्रोबिल्युरिन श्रेणीतील बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी केल्याने या रोगाविरुद्ध चांगले परिणाम देते. आधीच संक्रमित क्षेत्रात, ट्रायझोल कुटुंबातील उत्पादने किंवा दोन्ही उत्पादनांचे मिश्रण वापरावीत.

कशामुळे झाले

प्युसिनिया स्टिफॉर्मिस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी बंधनकारक बुरशी असुन तिला जिवंत रहाण्यासाठी जिवंत झाडाची आवश्यकता असते. बीजाणू वार्‍याबरोबर शेकडो कि.मी. पसरु शकतात ज्यामुळे मोसमात रोगाची साथ येते. झाडाच्या नैसर्गिक छिद्रातुन आत प्रवेश करून पानांच्या पेशीत घर करतात. रोग मुख्यत: वाढीच्या मोसमाच्या सुरवातीला होतो. समुद्रसपाटीपासुन जास्त उंचावर, उच्च आर्द्रता (दव), पाऊस आणि ७ ते १५ डिग्री सेल्शियसचे थंड तापमान बुरशीच्या वाढीला अनुकूल आहेत. जेव्हा तापमान नेहमी २१-२३ डिग्री सेल्शियसचच्या वर असते तेव्हा बुरशी कमी होते कारण या वाढलेल्या तापमानाने बुरशीचे जीवनचक्र विस्कळीत होते. गहू, जव आणि राय हे पर्यायी यजमान आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास रोग प्रतिकारक वाण लावा.
  • पुरेसे नत्रयुक्त खत द्या पण अतिरेकी वापर टाळा.
  • शेतातुन स्वयंभू रोपे शोधुन काढुन टाका.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे अवशेष खोल नांगरुन गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा