गहू

सुटी काजळी (काणी)

Ustilago segetum var. tritici

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फुले येण्याच्या सुमारास लक्षणे दिसु लागतात.
  • कणसातील दाणे भुकटी सारखे काळे असतात आणि विशिष्ट असा "मेलेल्या माशांचा" वास येतो.
  • दाण्यांच्या ऐवजी बुरशी विकसित होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

फुले येण्याच्या सुमारास लक्षणे दिसु लागतात. काळपट कणसातील दाणे भुकटी सारखे काळे असतात आणि विशिष्ट असा "मेलेल्या माशांचा" वास येतो. दाण्यांची जागा बुरशी घेते आणि संक्रमित ओंबीत दाणे भरत नाहीत. गव्हाचे पीक घेणार्‍या जगातील सर्व प्रदेशात हा रोग सापडतो. संक्रमित ओंबीतुन शून्य उत्पादन होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणे २०-३० डिग्री सेल्शियसच्या कोमट पाण्यात ४-६ तास भिजवा व नंतर त्यांना ४९ डिग्री सेल्शियसच्या गरम पाण्यात २ मिनीटांसाठी बुडवून ठेवा. पुढच्या पायरीमध्ये हे बियाणे उन्हात ४ तासांसाठी प्लास्टिकच्या कागदावर पसरुन ठेवा. पेरणी आधी बिया पूर्णपणे हवेनेच वाळल्या पाहिजेत. या बीजप्रक्रियेमुळे संक्रमणाची जोखिम कमी होते पण बिया रुजण्याच्या दरावरही परिणाम होऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अंतरप्रवाही बुरशीनाशके जसे कि कार्बोक्सिन किंवा ट्रायामेनॉल यांनी बीजप्रक्रिया केल्यास त्याला रुजणारे बियाणे शोषेल आणि बियाणांतील बुरशीचे नियंत्रण होईल किंवा मारली जाईल. बीजप्रक्रियेसाठी ट्रिटिकोनाझोल, डिफेनोकोनाझोल आणि टेब्युकोनाझोल सारखी बरीचशी इतर मिश्रणे उपलब्ध आहेत.

कशामुळे झाले

बियात रहाणार्‍या उस्टिलागो ट्रिटिसी नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी संक्रमित गव्हाच्या बियांत सुप्तावस्थेत रहाते. बुरशीचा विकास झाडाच्या वाढीच्या बरोबरीने चालतो. जेव्हा संक्रमित बियाणे रुजतात, तेव्हा बुरशीची वाढ गव्हाच्या कोवळ्या रोपातील कोंबांबरोबर सुरु होते आणि अखेरीस फुलात ती घर करते. परागकणांच्या ऐवजी फुलांतुन बुरशीचे बीजाणू निरोगी फुलांवर वार्‍याद्वारे पसरतात. तिथे ते रुजतात आणि आतील भागात घर करतात आणि नविन बियाणांत शिरुन रहातात. संक्रमित बियाणात जरी सुप्तावस्थेतील बीजाणू असले तरी ती वरुन निरोगी दिसतात. हे बियाणे रुजविण्यासाठी वापरले गेल्यास हे चक्र पुन्हा सुरु होते. पीकांचे राहिलेले अवशेष, पाऊस आणि किडे हे बीजाणू पसरण्याचे अन्य मार्ग आहेत. आर्द्र हवामान (६०-८५% सापेक्ष आद्रता) आणि बरोबर वारंवार पडणारा पाऊस किंवा दव आणि १६-२२ डिग्री सेल्शियसचे थंड हवामान या बुरशीच्या बीजाणूंना पटकन रुजण्यासाठी अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • वेगळ्या शेतात कामासाठी जाताना हत्यारे, हात आणि पायताण स्वच्छ करायला विसरु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा