गहू

गव्हाच्या पानावरील तांबेरा

Puccinia triticina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पान, पर्णकोष आणि कुसांवर बरेचसे बारीक लालसर नारिंगी ते तपकिरी फोड येतात.
  • संवेदनशील झाडांमध्ये, दुय्यम पुटकुळ्या व फिकट हिरवी किंवा पिवळी प्रभावळ मुख्य फोडांच्या आजुबाजुला येते.
  • गव्हाच्या जास्त प्रतिकारक वाणात, नारिंगी फोड बारीक असतात आणि सभोवताली पिवळे किंवा करपट भाग दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

पानावरील तांबेरा हा गव्हातील सर्वसामान्य रोग आहे. लक्षणे संक्रमित झाडाच्या संवेदनशीलतेवर अवलंबुन असतात. वैशिष्ट्यपूर्ण बारीक लालसर नारिंगी ते तपकिरी फोड पानाच्या दोन्ही बाजुला, पर्णकोषांवर आणि कुसांवर विखुरलेले दिसतात. हे फोड सुमारे १.५ मि.मी. व्यासाचे असतात व थोडे उंचवटलेले आणि लंबगोल आकाराचे असतात. संवेदनशील झाडात, दुय्यम पुटकुळ्या व फिकट हिरवी किंवा पिवळी प्रभावळ मुख्य फोडांच्या आजुबाजुला येतात व कालांतराने रंग बदलुन गडद तपकिरी किंवा काळ्या होतात. गव्हाच्या जास्त प्रतिकारक वाणात, नारिंगी फोड बारीक असतात आणि सभोवताली पिवळे किंवा करपट भाग दिसतात. संक्रमणामुळे झाडाच्या पेशींना नुकसान होते, पाणी कमी होते व उत्पादकता खालावते. या लक्षणांबरोबरच फुलधारणा कमी येणे आणि दाणे आक्रसलेले येत असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

प्युसिनिया ट्रिटिसिनाविरुद्ध कोणतेही सेंद्रिय उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार ‍पद्धतीचा वापर करा. या रोगास प्रतिबंध करण्यासाठी प्रॉपिकोनाझोल किंवा ट्रायाझोल असणार्‍या बुरशीनाशकाची फवारणी केली जाऊ शकते. बुरशीनाशक कसे वापरावे याच्या सूचना काळजीपूर्वक वाचा. वापरण्याची वेळ आणि मात्रा व्यवस्थित असल्यास प्रतिकाराचा विकास टाळला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

हा रोग प्युसिनिया ट्रिटिसिना नावाच्या झाडाच्या पेशींवरच जगणाऱ्या परजीवी बुरशीमुळे होतो. या बंधनकारक बुरशीला आपले जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जिवंत गव्हाचे झाड किंवा पर्यायी यजमानांची आवश्यकता असते. बीजाणू त्यांच्या स्त्रोतापासुन शेकडो कि.मी. अंतरापर्यंत वार्‍याबरोबर पसरु शकतात. बीजाणू रुजायला उच्च आद्रता किंवा पाने फार काळ ओली रहाणे आणि १० ते ३० डिग्री सेल्शियसचे तापमान (१६-२२ डिग्री सेल्शियसचे तापमान उत्कृष्ट असते) अनुकूल असते. या परिस्थितीत, बीजाणू पानांशी संपर्कात आल्यानंतर अवघ्या ३० मिनीटात रुजतात. नत्रयुक्त खतांचा अतिरेक वापर देखील या रोगाच्या प्रसारास अनुकूल असते. झाडाच्या पानावरील किंवा पर्णकोषातील नैसर्गिक छिद्रातुन बुरशी आत प्रवेश करते. शेतातील परिस्थितीप्रमाणे बुरशीचा जीवनक्रम ७-८ दिवसांत संपु शकतो. प्युसिनिया ट्रिटिसिनाचे धान्याच्या जातीत भरपूर पर्यायी यजमान आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • स्थिर आणि प्रतिकारक वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • गव्हाची रब्बीची पेरणी नेहमीपेक्षा उशीरा करा आणि खरीपाची पेरणी लवकर करा.
  • शेतातुन स्वयंभू रोपे शोधुन काढुन टाका.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • निरोगी पिक फेरपालटची योजना आखुन राबवा.
  • नत्रयुक्त खत पुरेसे द्या.
  • कापणीनंतर झाडाचे अवशेष काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा