इतर

पेनिसिलियम कणीस कुज

Penicillium spp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बुरशी मक्याचे कणीस संक्रमित करते, प्रवेश मार्ग किड्यांनी उपद्रव केलेली जागा किंवा शेतात काम करताना झालेली जखम असु शकते.
  • कणसाच्या वरच्या पृष्ठभागावर आणि दाण्यांवर निळसर हिरव्या रंगाची बुरशी दिसते.
  • संक्रमित दाणे विशेषत: फिकट पांढरे पडतात आणि आतुन कुजतात (या लक्षणाला ब्लू आय म्हणतात).
  • काही वेळा या बुरशीचे थर पीक घेतल्यानंतर किंवा साठवणीदरम्यान नजरेस पडतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

इतर

लक्षणे

पेनिसिलियम कणिस कूज पीक काढल्यानंतर कणसांवर आढळते म्हणुन हे नाव. झाडाच्या वाढीच्या काळात संक्रमण झाल्यास वाढ खुंटणे व झाड पिवळी पडणे, वाढ खुंटणे किंवा वाळणे सारखी लक्षणे दिसतात. झाडाच्या वाढीच्या नंतरच्या काळात संक्रमण झाले असता बुरशी कणसाला प्रभावित करते, प्रवेश मार्ग किड्यांनी उपद्रव केलेली जागा किंवा शेतात काम करताना झालेली जखम असु शकते. वाढलेले तापमान आणि उच्च आर्द्रता यामुळे निळसर हिरवी बुरशी कणसाच्या पृष्ठभागावर आणि दाण्यांवर दिसते. संक्रमित दाणे विशेष फिकट पांढरे पडतात आणि आतुन कुजतात (या लक्षणाला ब्लू आय म्हणतात). काही वेळा पीक घेतल्यानंतर किंवा साठवणीतच ही लक्षणे दिसतात. कुजणार्‍या दाण्यांमुळे उत्पादनात व साठवणी दरम्यान मोठे नुकसान होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

पेनिसिलियम जातीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अगदीच गरज पडल्यास मँकोझेब किंवा कॅप्टन असणारी बुरशीनाशके वापरली जाऊ शकतात.

कशामुळे झाले

पेनिसिलियम जातीची बुरशी ही हवेत रहाते आणि पर्यावरणात सर्वव्यापी आहे. पाण्याची कमी उपलब्धता असतानाही ती वाढु शकते आणि जमिनीतील संक्रमित झाडांच्या अवशेषात किंवा साठवणीच्या जागेतही वाढु शकते. त्यांचा प्रसार बहुधा, वार्‍याने आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्यामुळे होतो आणि झाडाच्या जखमेतुन ती कणसाला संक्रमित करते. उच्च आर्द्रता आणि वाढलेल्या तापमानात ती फोफावते. फुले आणि कणीस धारणेच्या काळात ही सर्वसामान्यपणे दिसते. पहिले लक्षण कदाचित साठवणीतच दिसु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्त्रोतांकडुन घेतलेले बियाणेच वापरा.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • पेरणीची वेळ समायोजित करा जेणेकरून दाणे भरण्याच्या काळात कमी पाऊस आणि कमी आर्द्रतेचे वातावरण राहील.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • शेतातील तण आणि पर्यायी यजमान काढुन टाका.
  • शेतात काम करताना झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • प्रादुर्भावाचे नुकसान टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर काढणी करा.
  • दाण्यांवर बुरशीजन्य वाढ टाळण्यासाठी साठवणी दरम्यान दाण्यांतील आद्रता १४% पेक्षा कमी राहील याची खात्री करा.
  • संक्रमित दाण्यांना पुढच्या मोसमात बियाणे म्हणुन वापरु नये.

प्लँटिक्स डाऊनलोड करा