टोमॅटो

टोमॅटोवरील खोडकुज

Didymella lycopersici

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • गडद, स्पष्ट खोलगट डाग खोडाच्या खालच्या बाजुला येतात.
  • प्रभावित भागात अतिसूक्ष्म काळे ठिपके दिसतात.
  • रोपे मरगळतात आणि हळुहळु सुकतात.
  • फळे काळी पडतात आणि आक्रसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

संक्रमण बहुधा खोडावर किंवा जमिनीच्या वर होते, पण पाने जर जमिनीच्या संपर्कात आली तर ती ही प्रभावित होतात. तपकिरी, स्पष्ट आणि खोलगट डाग प्रथम खोडावर दिसतात. जसे ते वाढत जातात, हे डाग खोडाला वेढतात, ज्यामुळे मरगळ होते आणि नंतर रोप सुकते. प्रभावित भागात अतिसूक्ष्म काळे ठिपके दिसतात. दुय्यम डाग किंवा कँकर्सही नंतर खोडाच्या वरच्या भागात दिसतात. उडणार्‍या पाण्याने बीजाणू इतर रोपाच्या इतर भागात पसरतात, ज्यामुळे अतिरिक्त संक्रमण होते आणि रोगाचा प्रसार होतो. प्रभावित फळे काळी पडतात आणि आक्रसु लागतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोगाला टाळण्यासाठी किंवा त्याच्या घटना कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपायच सगळ्यात चांगले असतात. ट्रिकोडर्मा हरझियानम बुरशीचे काही स्ट्रेन डी. लयकोपरसिकिचे चांगले नियंत्रण करतात आणि परिणामी उत्पन्नही वाढते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाला टाळण्यासाठी किंवा त्याच्या घटना कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपायच सगळ्यात चांगले असतात. वेळेत वापर केला तर बुरशीनाशकांचे उपचार परिणामकारक असतात.क्लोरोटॅलोनिलवर आधारीत उत्पाद नविन संक्रमण थांबविण्यात काम करतात.

कशामुळे झाले

डिडिमेला लायकोपेरसिकि नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी जमिनीत आणि संक्रमित रोपाच्या अवशेषात रहाते. बुरशी सहजपणे रोपाला झालेल्या जखमांतुन, म्हणजे नेहमीची छाटणी वगैरे, आत शिरते. पर्यायी यजमान नाइटशेडच्या कुटुंबांपर्यंतच सीमित आहेत, टोमॅटो ह्याच कुटुंबात येतात. पानांवरील डागात उशा असतात ज्यात बीजाणू तयार केले जातात. हे नंतर वार्‍याने किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याने निरोगी रोपांवर पडतात. असेही समजले जाते कि ह्या रोगाचे वहन संंसर्गित बियाणांद्वारे होते. डिडिमेला खोडकुज पुष्कळशा परिस्थितीत होते. तरीपण थंड हवामान (२० डिग्री सेल्शियस), ओले हवामान आणि जोरदार पाऊस किंवा फवारा सिंचन जास्त चांगले आहेत. रोपे जशी वाढतात तशी जास्त संवेदनशील होतात आणि जमिनीतील नत्र आणि स्फुरदाची कमतरता रोगाच्या बळावण्यात योगदान देते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन निरोगी बियाणे घ्या.
  • प्रतिकारक वाण लावा.
  • हरितगृहात रोपे वाढविताना झाडीत हवा चांगली खेळती रहाण्यासाठी रोपांमध्ये पुरेशी जागा सोडा.
  • खालची पाने जमिनीच्या संपर्कात येऊ देऊ नका किंवा ती काढुन वा छाटुन टाका.
  • पाणी सकाळी द्या आणि फवारा सिंचन टाळा.
  • किमान ३ वर्षांसाठी तरी विविध पिकांशी फेरपालट करा.
  • पुष्कळ अठवड्यांसाठी जमिनीला उन्हात तापू द्या.
  • शेतात काम करताना रोपाला धक्का लागु देऊ नका.
  • संक्रमित रोपे संक्रमण कळताच काढुन टाका.
  • काढणीनंतर रोपांचे सर्व अवशेष काढुन जाळुन टाका.
  • शेतातील काम झाल्यानंतर काठ्या आणि उपकरणे निर्जंतुक करण्याची काळजी घ्या.
  • हरितगृहात आर्द्रता ९०% पेक्षा खाली आणि तापमान १५ डिग्री सेल्शियसच्या वर ठेवा.
  • टोमॅटोला आधार देण्यासाठी वेताच्या काठ्या किंवा निलगिरीच्या काठ्या वापरा कारण ह्यामुळे रोगाच्या घटना कमी होतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा