बटाटा

बटाटा पिकावरील काळी बुरशी

Rhizoctonia solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बटाट्याच्या पृष्ठभागावर टणक उंचावटलेले डाग उमटतात.
  • वरच्या मुळांवर आणि नविन फांद्यावर तपकिरी खोलगट धब्बे विकसित होऊन पांढर्‍या बुरशीची वाढ निर्माण होते.
  • पाने कोमेजून रंगहीन होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बटाटा

लक्षणे

अनियमित आकाराचे आणि मापाचे उंचावटलेले काळे डाग बटाट्याच्या कंदाच्या (स्कर्फस) पृष्ठभागावर येतात. हे काळे डाग सहजपणे घासुन किंवा खरवडुन काढले जाऊ शकतात. हस्तभिंगाच्या सहाय्याने पांढरी बुरशी ह्या डागांभोवती पाहिली जाऊ शकते. ह्या रोगाची लक्षणे स्टेम कँकरसारखीच नविन कोंब आणि फांद्यांवर येतात. वरच्या मुळांवर तपकिरी खोलगट धब्बे विकसित होऊन पांढर्‍या बुरशीची वाढ निर्माण होते. जर बुरशीच्या कुजीने खोडाला वेढले तर पाणी आणि पोषणाचे वहन पानांपर्यंत होत नाही आणि पाने रंगहीन होऊन सुकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैव बुरशीनाशक ट्रिकोडर्मा हरझियानम किंवा जंतुविरहित र्‍हिझोक्टोनिया जातीला नांगरताना वापरले जाऊ शकते. ह्यामुळे काळ्या बु्रशीची घटना शेतात कमी होऊ शकते तसेच बाधीत कंदांची संख्याही कमी होते. इतर शक्यता आहे कि नांगरताना गुरांच्या शेणखताचा वापर किंवा हिरव्या राईच्या अवशेषांनी जमिनीचे धूमन करणे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फ्ल्युओडिओक्झिनिल किंवा थियोफेनेट मिथाइल आणि मँकोझेबचे मिश्रण ह्यांचा बीज प्रक्रियेमध्ये वापर केल्यास बऱ्याच प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार होण्यापासुन वाचले जाऊ शकते ज्यात काळी बुरशीही येते. लागवडीच्या वेळी सरीमध्ये फ्ल्युटोनिल किंवा अॅझॉक्सिस्ट्रोबिनचे वापर केले असता बुरशीची वाढ नियंत्रित करण्यात मदत मिळते.

कशामुळे झाले

हे रोग र्‍हिझोक्टोनिया सोलानी नावाच्या बुरशीमुळे होतो. ५ ते २५ डिग्री सेल्शियस तापमानात बुरशी जमिनीत फार काळापर्यंत, बटाटे नसतानाही जगु शकते. लागण जमिनीतुन किंवा संक्रमित कंदाचे बियाणे म्हणुन वापर केल्यास होऊ शकते. बुरशीमुळे कुज होत नाही पण कंदांचा वापर बियाणे म्हणुन केला जाऊ शकत नाही. थंड आणि ओल्या हवामानात लागण वाढु शकते. झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्याच्या काळात गरम तापमानाने रोगाचा परिणाम कमी होतो. काळी बुरशी आणि स्टेम कँकर जास्त करुन हलक्या आणि वालुकामय जमिनीत सर्वसाधारणपणे आढळतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेली किंवा प्रमाणित स्त्रोताकडुन घेतलेले बियाणेच वापरा.
  • हंगामाच्या सुरुवातीला लागवड करणे टाळा.
  • जमिन उबदार असताना (८ डिग्रीच्यावर तापमान) लागवड करा.
  • उथळ सरी वरंबा पद्धतीचे अवलंबन केल्यास जमिनीतुन कोंब लवकर वर येण्यासाठी मदत होईल.
  • पीक फेरपालट करा.
  • पीक घेतल्यानंतर पर्यायी यजमान नसणार्‍या झाडांचे अवशेष तसेच सोडा.
  • खास करुन कोरड्या काळात झाडांना पुरेसे पाणी द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा