काकडी

काकडीवरील करपा (स्कॅब)

Cladosporium cucumerinum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पाणी शोषल्यासारखे किंवा फिकट हिरव्या रंगाचे लहान डाग पडतात व कालांतराने सुकून कोरडे छिद्र निर्माण होते.
  • फळांवर छोटे लहान राखाडी चट्टे पडून त्यातुन, चिकट द्रव्य निघते व कालांतराने ह्या द्रव्यावर जीवाणूचे दुय्यम संक्रमण होऊन फळ सडते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

काकडी

लक्षणे

सुरुवातीला पानांवर पाणी शोषल्यासारखे किंवा फिकट हिरव्या रंगाचे भरपूर लहान डाग पडतात. हे डाग कालांतराने सुकुन मरतात आणि पांढरट ते राखाडी कोनेदार होतात. बहुधा चट्टयांवर पिवळसर कडा असते. ह्या चट्ट्यांचे केंद्र सुकून गळून जातात व पानांवर फाटुन छिद्र पडलेले आढळते. सर्वाधिक गंभीर लक्षणे संक्रमित फळांवर विकसित होतात आणि कीटकांनी डंक मारल्यासारखी लक्षणे दिसतात. सुरुवातीला फळांवर लहान (साधारणपणे ३ मिलिमीटरचे), राखाडी, थोडे दबलेले, चिकट पदार्थ झिरपणारे डाग दिसतात व नंतर ते डाग मोठे होऊन शेवटी स्पष्टपणे दिसणारा खोलगट भाग किंवा खपली धरते. ह्या संक्रमित फळांमध्ये संधीसाधू जीवाणू जसे कि मऊ कूज करणारे जीवाणू, घुसपेठ करतात ज्यामुळे फळ सडते व घाणेरडे वास येतो. उच्च प्रतिरोधक फळात खासकरुन काही भोपळ्यात आणि डांगरात निराकार गोळ्यासारखी रचना तयार होऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

काकडीवरील खपली रोगासाठी प्रत्यक्ष जैविक उपचार शक्य नाही. प्रमाणित जैविक कॉपर-अमोनियम कॉम्प्लेक्सवर आधारीत बुरशीनाशकाचा वापर केल्यास ह्या रोगाचा प्रसार कमी गतीने होण्यात चांगली मदत होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

एकात्मिक रोग व्यवस्थापन उपाययोजनांचा वापर करा. क्लोरोथॉलोनील असलेले किंवा कॉपर-अमोनियम कॉम्प्लेक्सवर आधारीत बुरशीनाशक वापरा. 0.5% सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणात बी 10 मिनिटे भिजविल्याने त्याच्या पृष्ठभागावरील जंतुंचा नाश होतो. डायथियोकार्बामेट्स, मॅनब, मॅन्कोझेब, मेटीराम, क्लोरोथॉलोनील आणि अनिलाझिन असणारी बुरशीनाशके सी. कुकुमेरिनमविरुद्ध प्रभावीपणे काम करतात.

कशामुळे झाले

ह्या रोगाचे लक्षण क्लाडोस्पोरीयम कुकुमेरीनम या बुरशीमुळे उद्भवते जी हिवाळ्यात जमिनीतील भेगात, झाडाच्या अवशेषांवर किंवा संक्रमित बियाणांवर विश्रांती घेते. वसंत ऋतुमध्ये ह्या रोगाचे संक्रमण यापैकी एका स्त्रोतापासुन होऊ शकते. बुरशी, बीजाणू तायर करण्याची रचना बनविते आणि बीजाणू सोडते. बीजाणूंचा प्रसार किडी, कपडे किंवा शेतीपयोगी अवजारांद्वारे किंवा आर्द्र हवेत वार्‍यामुळे लांब अंतरापर्यंत होऊ शकतो.जास्त आर्द्रतायुक्त आणि मध्यम तापमानात, 12-25 सेल्शियस तापमानात, यासोबत आर्द्र हवामान, वारंवार पडणारे धुके, दव किंवा हलका पाऊस ह्या रोगाला अनुकूल आहे. ह्या रोगाचे रोपांच्या भागात संक्रमण झाल्यापासुन ३ ते ५ दिवसानंतर झाडावर लक्षणे दिसायला सुरुवात होते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • उपलब्ध असल्यास ह्या रोगास सहनशील जाती लावा.
  • लागवडीसाठी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनींची निवड करा.
  • गरमट वातावरणात करप्याचा प्रसार खूप कमी होत असल्याने शक्यतो काकडीची लागवड गरमट हवामानात, वसंत ऋतुत उशीरा, उन्हाळ्यात किंवा शरद ऋतुच्या सुरवातीला करावी.
  • काकडी पिकाचा फेरपालट मक्यासारख्या यजमान नसलेल्या पिकांसह (2 किंवा त्या पेक्षा जास्त वर्ष) करण्याची शिफारस केलेली आहे.
  • तण आणि स्वयंभू काकडीची रोपे यांचे नियंत्रण करा.
  • झाडावर पावसामुळे किंवा दवामुळे ओलावा असल्यास शेतामध्ये काम करणे टाळावे.
  • लागवडीच्या वेळी रोपात अंतर जास्त ठेवल्यास हवा खेळती राहून आर्द्रता कमी होईल.
  • जास्त पाणी देणे व स्प्रिंकलर सिंचन पद्धत टाळावी.
  • लक्षणांसाठी पिकांचे नियमितपणे निरीक्षण करत चला.
  • संक्रमित झाडे व त्यांचे अवशेष काढून टाका व नष्ट करा (जाळून टाका).
  • शेती उपयोगी अवजारे, सामग्री तसेच कुंड्या आणि फुलांची खोकी नेहमी निर्जंतुकीकरण करून वापरत चला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा