मका

मक्का पिकावरील काणी

Ustilago maydis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • रोपावस्थेत वाढ खुंटते आणि फुले किंवा कणीस येत नाहीत.
  • जुन्या रोपांवर संक्रमण झाले असता कणसात गाठीयुक्त काळ्या काणीने भरलेली बिजाणुफळे येतात.
  • जशी ती फुटतात त्यात काळी भुकटीसारखी सामग्री आढळते.
  • पानांवरील गाठी सामान्यपणे लहान असतात आणि न फुटता सुकुन जातात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

झाडाचे सर्व सक्रियपणे वाढणारे भाग या बुरशीच्या संक्रमणास बळी पडतात. झाडांची जखमांना संवेदनशीलता आणि वाढीची संभावना यामुळे त्यात बरीच नाट्यमय लक्षणे दिसु शकतात. पिक रोपावस्थेत असताना संक्रमणास सर्वात जास्त संवेदनशील असतात. अशा वेळी झाडाची वाढ खुंटते आणि फुल किंवा कणीस येत नाहीत. जुन्या झाडातील संक्रमणामुळे गाठी येतात ज्यात यजमान आणि बुरशीचे भाग यांचा संयोग होतो. काणीची बिजाणुफळे सुरवातीला हिरवट पांढरी असतात आणि कालांतराने पक्व होताना काळी पडतात. ते कणसावर विशेषतः वैशिष्ट्यपूर्ण असतात ज्यामुळे प्रत्येक दाणा एका बिजाणुफळामध्ये विकसित होऊ शकतो. जशी ती फुटतात त्यात काळी भुकटी सारखी सामग्री आढळते. पानांवरील गाठी सामान्यपणे लहान असतात आणि न फुटता सुकुन जातात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बुरशीचे थेट नियंत्रण कठिण आहे आणि कोणतीही परिणामकारक पद्धत या बुरशीविरुद्ध विकसित केली गेली नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया किंवा पानांवरील फवारणीने या रोगाच्या संक्रमणाचे प्रमाण घटत नाहीत.

कशामुळे झाले

उस्टिलागो मेडिस नावाच्या बुरशीमुळे काणी उद्भवते जी बरेच वर्षांपर्यंत जमिनीत राहू शकते. बीजाणू वारा, जमिनीवरील उडणारी धूळ आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने झाडावर पसरतात. झाडांना किटक, प्राणी, शेतीत काम करताना किंवा गारपीटीने झालेल्या जखमा संक्रमणास अनुकूल असतात. एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर थेट दुय्यम संक्रमण होत नाही. झाडाच्या वाढत्या भागावर (कणिस किंवा शेंडा) ही लक्षणे खास करुन गंभीरपणे दिसतात. अतिटोकाची हवामान परिस्थिती (जसे कि दुष्काळानंतर अतिवृष्टी) ज्यामुळे फारच कमी पराग निर्मिती होते आणि परागीकरण दर कमी असतो हे ही या बुरशीला प्रोत्साहन देतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास सहनशील वाण लावा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • लक्ष ठेऊन बिजाणुफळे फुटुन बीजाणू सोडण्याआधी जमा करुन नष्ट करा.
  • किडे आणि इतर कीटकांमुळे होणारे नुकसान टाळा.
  • मशागत किंवा शेतात काम करताना झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • नत्रयुक्त खते जास्त देऊ नका.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे सर्व अवशेष काढा आणि संक्रमित झाडे शेणखत करण्यासाठी वापरु नका.
  • मोठ्या कालावधीसाठी यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट योजना करा.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे स्वच्छ असण्याची खात्री करा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरुन झाडांचे अवशेष गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा