इतर

प्लमवरील पोकळ गाठ

Taphrina pruni

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • लांबट, बिन बियांची गाठ फळांवर येते.
  • गाठीला बुरशीच्या बीजाणूंचा पांढरा मोहोर आच्छादित करतो.
  • फ़ळे आक्रसतात आणि गळतात, काही झाडावरच "ममीफाइड" अवस्थेत रहातात.
  • प्रभावित फांद्या जाड होतात आणि पाने छोटी होतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
चेरी
पीच

इतर

लक्षणे

पक्व होत असलेल्या फळावर गाठी येतात, ज्यामुळे फळे बीजरहित, लांबट, चपटी, पोकळ होतात जी जीभेसारखी दिसतात. जादा वाढ रंगाने वेगवेगळी असते, फकट हिरवा ते राखाडी ते फिकट नारिंगी. गाठीचा पृष्ठभाग खडबडीत होतो आणि बुरशीने आच्छादित असतो, ज्यावर बीजाणू तयार करण्याची पांढर्‍या रंगाच्या रचनेचे आवरण दिसते. फळे खाण्याजोगी रहात नाहीत, आक्रसतात आणि बहुतेक वेळा अकाली गळतात. जी फळे फांद्यांनाच लटकलेली असतात ती रसहीन (ममीफाइड) असतात आणि पूर्ण थंडीच्या काळात झाडावरच राहू शकतात. विकृत फळे लागलेल्या फांद्याही जाड होतात आणि विकृत प्रकारे वाढतात. पाने छोटी आणि पट्ट्यासारखी असतात आणि फुटवे सूज आल्यासारखे, फिकट पिवळे आणि लाल छटेचे असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

टॅपर्‍हिना प्रुनीचे साधे, स्वस्त आणि ठराविक नियंत्रण कॉपरवर आधारीत सेंद्रिय बुरशीनाशकांना (किंवा इतर मिश्रणांना) मुख्य फुलधारणेच्या काळात वापरुन केले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असल्याने, प्लमवरील पोकळ गाठीचे चांगले परिणामकारक नियंत्रक उपचार उपलब्ध नाहीत. तरीपण वार्‍याबरोबर पसरणारे बीजाणू तयार होण्यापूर्वी संक्रमित फांद्या काढुन, चेटकिणीच्या झाडुसारखे भाग आणि फळे काढुन टाकल्याने काही प्रमाणात रोगाचे नियंत्रण केले जाऊ शकते. कॉपर असणार्‍या बुरशीनाशकाच्या वापराने बुरशीवर थोड्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येते.

कशामुळे झाले

टॅपर्‍हिना प्रुनी नावाच्या बुरशींच्या जंतुमुळे ही लक्षणे उद्भवतात. गाठींवर येणार्‍या बुरशीच्या पांढर्‍या आच्छादनात बीजाणू तयार होतात आणि नंतर दाबाखाली मुक्त होतात आणि वार्‍याद्वारे प्रसारीत होतात. ते कळ्यांच्या कोषात किंवा सालींच्या फटीत स्थिरस्थावर होतात जिथे कोणतीही दृष्य लक्षणे न दर्शविता ते अंकुरतात आणि वाढतात. वसंत ऋतुत जेव्हा परिस्थिती अनुकूल असते, तेव्हा बुरशीची वाढ पुन्हा सुरु होते आणि अतिसूक्ष्म दोर्‍यासारख्या नळ्या तयार करतात ज्या रोपांच्या भागात शिरतात, ज्यामुळे सूज आणि विकृत फुटवे दिसतात. फांद्यांच्या आणि काटक्यांच्या आतील भागात सुप्तावस्थेत रहातात आणि नंतरच्या हंगामात फुलांत आणि विकसित होणार्‍या फळात शिरतात. ओल्या आणि थंड हवामानात संक्रमणाची जोखीम संभवत: जास्त असते तर ऊबदार आणि कोरड्या हवामानात कमी घटना दिसुन येतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोप शक्तीवर्धके वापरुन रोपाला संक्रमणाशी लढण्यासाठी जोम द्या.
  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • झाडाखालील पाचोळ्यात कुजणारे साहित्या काढुन जाळुन टाका.
  • रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी संक्रमित फांद्या, काटक्या आणि फळे काढुन टाका (जाळा किंवा पुरा).

प्लँटिक्स डाऊनलोड करा