इतर

रुपेरी पाने

Chondrostereum purpureum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • अंधुक रुपेरी चमक झाडीवर दिसते.
  • फांद्या आणि काटक्या गडद तपकिरी होऊन मरतात.
  • पांढुरकी लोकरी, कंसाच्या आकाराची बुरशी झाड्याच्या सालीच्या वरच्या पृष्ठभागावर आणि जांभळी तपकिरी बुरशी खालच्या पृष्ठभागावर दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
सफरचंद
जर्दाळू
चेरी
पीच
अधिक

इतर

लक्षणे

बुरशीने प्रभावित पानांवर अंधुकशी रुपेरी चमक विकसित होते. सुरवातीला हे फक्त एकाच फांदीपर्यंत मर्यादित असते पण कालांतराने झाडाच्या इतर भागातही पसरु शकते. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, पाने फाटतात आणि कडांजवळ तसेच मध्यशीरेजवळ तपकिरी होतात. प्रभावित फांद्यांच्या साली खालचा आतील भाग गडद तपकिरी होतो आणि अखेरीस मर होते. उन्हाळ्यात उशीरानंतर चपट्या किंवा कंसाच्या आकाराची बुरशी मृत फांद्यांच्या सालीवर विकसित होते. त्याचा वरचा पृष्ठभाग पांढरा लोकरीसारखा आणि खालचा जांभळा तपकिरी असतो. दोन्ही बाजुला बीजाणू तयार करणारे भाग असतात आणि जेव्हा ओले असतात तेव्हा मऊ आणि निसरडे असतात, आणि कोरडे असताना ठिसुळ आणि आक्रसलेले असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

पुष्कळ बाबतीत रुपेरी पानाच्या हल्ल्यातुन झाड नैसर्गिकरीत्या सावरते म्हणुन कोणतेही उपाय करण्यापूर्वी थोडा काळ थांबण्याची शिफारस केली जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ज्या भागात रुपेरी पाने होत असतील तेथील संवेदनशील झाडांच्या छाटलेल्या भागावर शिफारशीप्रमाणे रंगाचे उपचार करणे ही सर्वसामान्य पद्धत आहे. तरीपण, काही तज्ञ असा दावा करतात कि ह्या जखमांना नैसर्गिकरीत्या भरु देणेच चांगले आहे.

कशामुळे झाले

चोंड्रोस्टेरियम पुरपुरियम नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात जी खोडावर आणि मृत फांद्यांवर विशिष्ट बीजाणू तयार करण्याचे भाग बनविते. ह्या भागातुन बीजाणू उत्पन्न होतात जे नंतर वार्‍याने इतर निरोगी झाडांवर आणि झुडपांवर प्रसारित होतात. ते मुख्यत: छाटणीच्या जखमातुन आत शिरतात. जसे ते लाकडात वाढतात, ते हळुहळु त्याला मारतात, ज्यामुळे विशिष्ट गडद छटा आतील भागात दिसते. ते विषारी द्रव्यही सोडतात जे रोपाच्या रसाबरोबर पानांत पोचते. हे विष आतील भागाला नुकसान करुन त्यांना वेगळे करते, ज्यामुळे रुपेरी पैलु दिसतो. म्हणुन जरी बुरशी पानांत उपस्थित नसली तर ती पानांना आणि फांद्यांना मारु शकते. नविन बीजाणू प्रजननाच्या रचना नंतर मृत लाकडावर तयार होतात आणि चक्र पुन्हा सुरु होते. पावसाच्या सरी, पावसाळी, धुके किंवा आर्द्र दिवसाबरोबर वारा न वाहणे किंवा ऊन नसणे हे बीजाणूंच्या मुक्त होण्यास आणि संक्रमणास अगदी योग्य परिस्थिती आहे.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ आणि निर्जंतुक केलेली उपकरणेच वापरा.
  • झाडांना विनाकारण जखमांपासुन वाचवा.
  • बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • वसंत ऋतुतील किंवा उन्हाळ्यातील नेहमीची उशीरा केली जाणारी छाटणी केल्याने संक्रमणाचा मुख्य टप्पा टाळता येतो.
  • हवामान ओलेते असताना छाटणी करणे टाळा, कारण ते संक्रमणास अनुकूल आहे.
  • बीजाणू ऊगवु नयेत म्हणुन जखमांवर पट्ट्या बांधा.छाटणी केलेली सामग्री लगेच (जाळुन किंवा पुरुन) नष्ट करा कारण बीजाणू अंकुरतच रहातात.
  • विलोज आणि पॉपलर्स सारखे पर्यायी यजमान बागेच्या आजुबाजुला लावु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा