लेट्यूस

केवडा (डाउनी)

Peronosporales

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळसर ठिपके दिसतात - नंतर तपकिरी वाळलेल्या धब्ब्यात रुपांतरीत होतात.
  • डागांच्या खाली पानांच्या खालच्या बाजुस दाट पांढरे ते राखाडीसर कापसासारखे आवरण तयार होते.
  • पानगळ होते.
  • वाढ खुंटते.
  • कोवळे कोंब, फुल आणि फळ वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते

10 पिके

लेट्यूस

लक्षणे

नविन वाढणाऱ्या पानांवर, विविध आकारांचे विखुरलेले पिवळसर ठिपके पानांच्या पृष्ठभागावर दिसतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन शिरांनी मर्यादित केल्यामुळे कोनेदार होतात. त्यांची करपट केंद्रे तपकिरी रंगाच्या विविध छटांची होतात. सहसा उबदार दमट रात्रींच्या मालिकेनंतर घनदाट, पांढरे ते राखाडीसर कापसासारखे आवरण ह्या डागांच्या खाली तयार होते आणि जास्त उन्हात नाहीसे होतात. कोवळ्या कोंबांची पानगळ होते किंवा वाढ खुंटते. झाडाच्या इतर भागांना तसेच फळांनाही हा रोग प्रभावित करतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

केवड्याचा प्रतिकार करण्यासाठी बाजारात जैव उपचार उपलब्ध आहेत. संसर्ग कमी असल्यास, काहीही न करणे चांगले, हवामान सुधारण्याची वाट पहावी. काही वेळा, संसर्गाआधी वापरावयाचे सेंद्रिय बुरशीनाशक झाडांना बुरशीपासुन वाचविण्यात मदत करतात. यामध्ये तांब्यावर आधारित बुरशीनाशके समाविष्ट आहेत जसे की बोर्डोक्स मिश्रण.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रतिबंधात्मक बुरशीनाशके झाडाला होणाऱ्या संसर्गातुन वाचण्यास मदत करतील पण ती पानाच्या खालच्या बाजुला योग्य रीतीने फवारली गेली पाहिजेत. डायथियोकार्बामेटच्या कुटुंबातील बुरशीनाशके वापरली जाऊ शकतात. संसर्ग झाल्यानंतर पहिले लक्षण दिसताच लगेचच संसर्ग झाल्यानंतर वापरली जाणारी बुरशीनाशके वापरली गेली पाहिजे. फॉसिटिल-अल्युमिनियम, अझोक्सीस्ट्रोबिन आणि फेनिलामाइडस सारखी औषधे संसर्ग झाल्यानंतर वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकात समाविष्ट आहेत.

कशामुळे झाले

पेरोनोस्पोरालेसा नावाच्या गटातील बुरशीमुळे ही लक्षणे दिसतात आणि सावलीच्या जागी जिथे वारंवार पाऊस पडतो आणि उबदार हवामान (१५-२३ डिग्री सेल्शियस) असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. ह्या बुरशीने तिच्या यजमानांसोबत चांगले जुळवुन घेतले आहे म्हणजे प्रत्येक मोठ्या पीकात त्याची स्वत:ची एक प्रजाती असते. बुरशी संक्रमित झाडाच्या अवशेषात किंवा कोंबात, जमिनीत किंवा पर्यायी यजमानात (पीके आणि तण) विश्रांती घेते. वारा आणि पावसाचे थेंब उडाल्याने तिचे बीजाणू अनुकूल वातावरणात पसरतात. बीजाणू फलित होतात आणि निर्माण झालेले प्रजोत्पादन पानांच्या खालच्या बाजुला असलेल्या नैसर्गिक छिद्रातुन आत शिरकाव करते. तिथे ते पेशींमधुन पसरते, अखेरीस पेशींपेक्षा त्यांची संख्या जास्त होते आणि बाहेरच्या बाजुला वैशिष्ट्यपूर्ण बुरशीचे आच्छादन तयार होते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास ह्या रोगास प्रतिकारक असलेल्या वाणांची निवड करा.
  • झाडांना कोरडे ठेवा उदा.
  • हवा चांगली खेळती असावी.
  • पाण्याचा निचरा व्यवस्थित राखा.
  • झाडाचा जोम चांगला रहाण्यासाठी संतुलित खताचा वापर करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • ज्या ठिकाणी मुबलक सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी व योग्य दिशेने लागवड करा.
  • तण नियंत्रण काटेकोरपणे करा व शेतातील झाडांचे अवशेष काढून टाका.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे स्वच्छ ठेवा.
  • संक्रमित माती आणि झाडाच्या साहित्याचे वितरण टाळा.
  • रोपे सुदृढ रहाण्यासाठी शक्तीवर्धके वापरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा