सफरचंद

सफरचंदवरील मूळ व बुंधा कुज

Phytophthora cactorum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पहिल्या लक्षणात येते कोंबांची वाढ कमी होणे, पाने बारीक पिवळसर, मरगळलेली असणे आणि झाडाची वाढ खुंटलेली असणे.
  • खोडाच्या आत नारिंगी ते लालसर तपकिरी छटेचा ठराविक भाग दिसतो.
  • बर्‍याच हंगामानंतर झाडाचा ऱ्हास होतो आणि अखेरीस मरतात.
  • फळावर गडद तपकिरी डाग येऊन फळ कूज देखील होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

सफरचंद

लक्षणे

सफरचंद आणि पेयर झाडावरील पहिली लक्षणे पानांवर दिसतात आणि वैशिष्ट्यपूर्णतेने कोंबाची वाढ कमी होते, पाने छोटी पिवळसर मरगळलेली असतात. झाडे देखील खुजी असु शकतात. या वेळेपर्यंत मूळ आणि शेंड्यात कुजीचा चांगलाच विकास झालेला असतो. साल काढल्यास आतील ठराविक भागात नारिंगी ते लालसर तपकिरी छटा दिसतात. जसजसा रोग वाढत जातो, या छटा देखील मोठ्या होऊन तपकिरी होतात. वाहक भाग सुकल्याने किंवा कुजल्याने पोषके संपूर्ण झाडात पसरत नाहीत. फिकट मरगळलेली पान, पानगळ होणे आणि यामुळे झाडाची वाढ खुंटणे यासारखी सामान्य ताणाची लक्षणे दिसतात. बर्‍याच हंगामानंतर झाडाचा ऱ्हास होतो आणि अखेरीस मरतात. फळावर गडद तपकिरी डाग येऊन फळ कूज देखील होऊ शकते. फळांची झाडे त्यांच्या परिपक्वतेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या कुजीला संवेदनशील असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

या बुरशीविरुद्ध आजपर्यंत तरी कोणत्याही जैविक पद्धती विकसित झालेल्या नाहीत. तरीपण, कॉपरवर आधारीत बुरशीनाशके संक्रमित खोडाच्या उपचारासाठी वापरली जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेफेनोक्झॅम, एट्रिडियाझोल किंवा फोसेटिल-अल्युमिनम असणारी बाजारातील बुरशीनाशके मातीतील दूषितपणा घालविण्यासाठी वापरली जाऊ शकतात पण झाडाच्या संक्रमित भागांच्या उपचारात काहीच कामाचे नाहीत. मेटालॅक्झिल+मँकोझेब ह्या मिश्रणाची झाडाच्या बुडाभोवती आळवणी केल्यास या पी. कॅक्टोरम खोडातील वाढ प्रतिबंधित करता येते.

कशामुळे झाले

फायटोप्थोरा कॅक्टोरम नावाच्या जमिनीतील बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जिचे यजमान भरपूर आहेत. ही ओल्या जमिनीत फोफावते आणि म्हणुन पाणी साचणार्‍या भागात, पाणथळीत किंवा शेतातील आर्द्रता जास्त असल्यास समस्या करते. ऊबदार काळात यांचे बीजाणू तयार होतात आणि म्हणुन संक्रमण होते. ही सफरचंद आणि पेयर या दोन्ही झाडांना प्रभावित करते पण पेयर झाडात क्वचितच हिची समस्या दिसते. फुलधारणेच्या आधीचा काळ हा संक्रमणासाठी अधिक चिंताजनक काळ आहे. गळलेल्या फळांतुन बुरशीचे बीजाणू बाहेर येणे किंवा संक्रमित कलम वापरणे हे संक्रमणाचे मोठे स्त्रोत आहेत. संक्रमण जमिनीखाली असल्यास शेंडा कूज आणि मुळ कुजेची लक्षणे आढळतात. मध्य कूज खोडाच्या खालच्या भागात जमिनीच्या वर होते. दोन्ही बाबतीत पानांवरील लक्षणे मुळांच्या आतील कूज आणि वाहक भाग खराब झाल्याचे दर्शवितात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • पाण्याचा निचरा चांगला राहील याची काळजी घ्या.
  • संक्रमित फांद्या आणि काटक्या काढुन टाका.
  • संक्रमित फळे देखील गोळा करुन भिजण्यासाठी पाटात टाका.
  • खोडाच्या आजुबाजुला तणांची वाढ जास्त होऊ देऊ नका.
  • झाडाच्या खोडाजवळ पालापाचोळा पसरा ज्याने माती उडणार नाही.
  • संक्रमित खोडाला वाळण्यासाठी माती बाजुला करुन वाळू द्या, शरद ऋतुत नविन माती टाका.
  • ठराविक उंचीवरील फळेच साठवणीत ठेवा.
  • ५% युरियाचे फवारणी करून बागेतील आर्द्रता वाढवा.
  • ट्रॅक्टरच्या वापराने माती उडुन फळे दूषित होणार नाहीत याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा