सोयाबीन

Glycine max

पाणी देणे
मध्यम

लागवड
थेट पेरणी

काढणी
80 - 120 दिवस

कामगार
कमी

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.6 - 7

"तापमान"
0°C - 0°C

खते देणे
मध्यम

सोयाबीन

परिचय

सोयाबीन (ग्लिसाइन मॅक्स) हे मूळचे पूर्व आशियातील फॅबिशिया कुटुंबातील शेंगवर्गीय पीक आहे. हे प्रामुख्याने त्याच्या खाद्य शेंगांसाठी प्रसिद्ध आहे जे चांगली प्रथिने आणि तेल प्रदान करतात. सोयाबीनचे उत्पादन करणारे मुख्य देश संयुक्त राज्य अमेरिका (एकुण जागतिक उत्पादनापैकी ३२%), ब्राझील (३१%) आणि अर्जेंटिना (१८%) आहेत.

सल्लागार

काळजी

काळजी

सोयाबीनच्या वाणांची निवड करताना, विविध वाणांची ठराविक वाढीच्या काळाची अनुकूलता वेगवेगळी असते याचा विचार करावा. सोयाबीनची लागवड करताना शेतातील उपद्रवांचा इतिहासही विचारात घ्यावा. काही वाणांमध्ये बहुतेक सर्व महत्वाच्या किडींविरुद्ध अनुवांशिक प्रतिकारकता असते. शेतात सोयाबीनच्या वाणांच्या विविधतेची खात्री करण्यासाठी वेगवेगळी वाणे लावा. ब्रॅडीर्हाीयझोबियम जॅपोनिकम जिवाणू बरोबर परस्परावलंबी सहजीवनाद्वारे सोयाबीन नत्राचा पुरवठा करते. उत्कृष्ट परिणामांसाठी, पेरणीपूर्वी जिवाणूच्या योग्य प्रजाती सोयाबीनच्या बियाण्यांबरोबर मिसळावे. सोयाबीनचे बियाणे ४ सें.मी. खोल आणि एकमेकांपासुन सुमारे ४० सें.मी. अंतरावर पेरावे. जमिनीचे तापमान किमान १० अंश सेल्सिअस आणि वरच्या दिशेने जात असतांना लागवड करण्याची शिफारस केली जाते.

माती

निरोगी, कसदार, काम करण्यासारखी जमिन ही सोयाबीनच्या लागवडीसाठी फायदेशीर असते. खासकरुन मध्यम जमिन चांगली असते कारण त्यात पाण्याचा निचरा चांगला होऊन देखील ओलावा योग्य प्रमाणात असतो. सोयाबीनच्या रोपांना सुमारे ६.५ सामू असलेली किंचित आम्ल जमिन आवडते. हे पीक समुद्रसपाटी पासुन २००० मी. उंचीपर्यंत घेतले जाऊ शकते.

हवामान

सोयाबीनची लागवड बहुधा मध्यपश्र्चिमी संयुक्त राज्य अमेरिका आणि दक्षिण कॅनडा सारख्या थंड, समशीतोष्ण प्रदेशात केली जाते पण इंडोनेशियासारख्या उष्णकटिबंधीय तापमानात देखील चांगले परिणाम आढळून आले आहेत. ऊबदार वाढीचा काळ, भरपूर पाणी आणि ऊन असले की हे पीक कुठेही घेतले जाऊ शकते. सोयाबीनचे कमी तापमानात नुकसान होऊ शकते परंतु मक्यासारख्या इतर पिकांपेक्षा हे काटक असते. सोयाबीनच्या वाढीसाठी २० ते ४० अंशातील तापमान आणि किमान ५०० मि.मी. पाऊसाची गरज असते. सोयाबीनच्या लागवडीत दिवसाची लांबी अत्यंत महत्वाची भूमिका निभावते. जिथे दिवसाची लांबी १४ तासांपेक्षा कमी असते तिथे चांगले उत्पादन मिळते.

संभाव्य रोग

सोयाबीन

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

सोयाबीन

Glycine max

सोयाबीन

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

सोयाबीन (ग्लिसाइन मॅक्स) हे मूळचे पूर्व आशियातील फॅबिशिया कुटुंबातील शेंगवर्गीय पीक आहे. हे प्रामुख्याने त्याच्या खाद्य शेंगांसाठी प्रसिद्ध आहे जे चांगली प्रथिने आणि तेल प्रदान करतात. सोयाबीनचे उत्पादन करणारे मुख्य देश संयुक्त राज्य अमेरिका (एकुण जागतिक उत्पादनापैकी ३२%), ब्राझील (३१%) आणि अर्जेंटिना (१८%) आहेत.

मुख्य तथ्ये