स्क्लेरोशिनिया खोडकुज - वांगी

वांगी वांगी

P

वांगी दीड महिन्याचे आहे

पणावरती पिवळे डाग पडतात,बुडक्यात बुरशी सारखे दिसते आहे हे काय आहे ह्यावर उपाय सांगावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pralhad Kumbhar Stem Rot च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Pralhad Kumbhar ॥ फंगस रोकनारे रसायन ॥ साहित्य : ०१.अर्धा किलो चांगले ठेचलेले आले ०२.अर्धा किलो देशी गुळ ०३.बरणी प्लास्टिक किंवा काचेची ( तयार होण्याचा कालावधी १० दिवस.) ++ कृति.:- आले आणि गुळ चांगले एकजीव करुन बरणीत भरणे.बरणी उन्हात ठेवणे.दहा दिवस तसेच राहूद्यावे,बरणीत घट्ट द्रावण तयार होईल ते दहा लिटर पाण्यामध्ये चांगले मिसळावे,व्यवस्थीत चाळून घ्यावे,२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर शेती मध्ये फवारणी करावी. लगेच फवारणी करायची असल्यास बाजारातून सल्फर लिक्विड नॅनो टेक्नॉलॉजीचे आणावे. २मिली प्रति लिटर पाणीमध्ये मिसळून फवारणी करायची.१ एकर साठी २०० मिली.लागेल. ++ लक्षणं :- झाडांची पानं वरुण सुकायला लागतात. पानांवर ब्राऊन रंगाचे डाग येतात. ब्लास्ट,ब्लाईट आणि रस्ट रोग येतात. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.जैविक,नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Pralhad Kumbhar ॥ फंगस रोधी रसायन (ट्रायकोफडर्मा).॥ आपल्याला लिक्विड स्वरुपातील ट्रायकोडर्मा खरेदी करावयाचा. यापासून हजारो लिटर द्रावण कसे बनवायचे ते पाहू. यासाठी प्रथम १ लिटर लिक्विड कल्चर घ्यावे.याचबरोबर निमेटोड कंट्रोल रसायन कमीतकमी किंवा २५० ग्रॅम घ्यावे,त्यातील पाहिजे तेव्हढे घेऊन बाकीचे फ्रिजमध्ये ठेवावे.वापरण्या अगोदर २ तास आधी बाहेर काढावे. एका वेळेला १०० मिली.घ्यावे. एका भांड्यात १० लि.पाणी घ्यावे,ते गरम करावे,गरम करताना त्यामध्ये २५ ग्रॅम गुळ किंवा दुध मिसळावे,उकळी आल्यावर त्याला थंड करावे. थंड झाल्यावर त्यात १०० मिली.ट्रायकोडर्मा कल्चर निमेटोड रसायन सोबत मिसळने. त्या १०० ग्रॅम गुळ आणि २०० मिली दुध मिसळून ते प्लॅस्टिक च्या भांड्यात भरावे व झाकण घट्ट बंद करावे. दुसर्‍या दिवशी झाकण उघडून एका स्वच्छ लाकडी काठिने ढवळावे.असे ८ (आठ) दिवस करावे. थंडीच्या दिवसात जिथे हलकी सुर्यकिरणे येतात तिथे ठेवणे,बाकी इत्तर वेळी सावलीत कुठेही ठेवावे. जास्त थंडी असेल तर उन्हात ठेवावे लागेल नाहीतर जिवाणूंची वाढ होणार नाही. अश्याप्रकारे आता आपल्याजवळ १०० मिलीचे १० लिटर द्रावण तयार झाले. यापैकी १ लि.घेऊन ते २०० लि.पाण्यात मिसळून वाहत्या पाण्यासोबत शेत जमिनीत देऊ शकतो किंवा ड्रिप द्वारे देऊ शकतो. हे आपण वारंवार दिलेतरी नुकसान होणार नाही उलटा फायदाच होईल. ही प्रक्रिया २ ते ३ वर्षे करत रहावे. १ लि उत्पादन आणून फ्रिज मध्ये ठेवल्यास ३ वर्षे वापरता येते. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा