टोमॅटो

सूज / गाठी

Transpiration disorder

इतर

थोडक्यात

  • पानांवर, फांद्यांवर आणि फळांवर फोड येतात.
  • पाने ठिसुळ होतात.

मध्ये देखील मिळू शकते


टोमॅटो

लक्षणे

पाण्याने भरलेले फोड आणि पानांच्या खालच्या बाजुस पिवळे ठिपके. ह्यामुळे पाने अनियमित मुडपतात. फोड फांद्या आणि फळांवरही येतात. पाने ठिसुळ होतात आणि हात लावल्यास फाटतात. हे असे होत कारण फोडांमुळे पानाची रचनाच अशक्त होते. जरी गाठींमुळे झाडाच्या एकुणच स्वास्थ्यावर फारसा परिणाम होत नसला तरी भाजी विक्रीसाठी आकर्षक रहात नाही ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. जर हवामान धार्जिणे असले तर भाजी पिकाच्या सर्व मऊ भागांवर गाठी येऊ शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ही समस्या किडींमुळे वा रोगांमुळेही उद्भवत नाही; म्हणुन जैविक नियंत्रणाची आवश्यकता आणि संबंधही नाही.

रासायनिक नियंत्रण

ही समस्या किडींमुळे वा रोगांमुळेही उद्भवत नाही; म्हणुन रसायनिक नियंत्रणाची आवश्यकता आणि संबंधही नाही.

कशामुळे झाले

जास्त पाणी देणे, जमिनीतुन पाण्याचा निचरा चांगला न होणे, ढगाळ थंड दिवसात ह्याची लागण होऊ शकते. जेव्हा झाड वापरण्याच्या दरापेक्षा जास्त पाणी शोषतात तेव्हा गाठी येतात. बहुधा ढगाळ दिवशी जेव्हा ऊन पुरेसे नसते, आर्द्रता जास्त असते किंवा हवा चांगली खेळत नसते तेव्हा जास्त पाणी दिल्यानेही गाठी येतात. कोबी आणि टोमॅटो हे, खासकरुन जमिनीत पाणी साचण्यास संवेदनशील असतात. गाठींचे फोड हे हवामान परिस्थितीत सुधार झाल्यानंतरही तसेच रहातात.


प्रतिबंधक उपाय

  • जास्त पाणी देऊ नका, खास करुन थंड आणि ढगाळ दिवसात जेव्हा झाडांना थोड कोरड ठेवल पाहिजे.
  • खेळती हवा वाढवा आणि लागवडीचे अंतर जास्त ठेवल्याने हवा चांगली खेळते.
  • जेव्हा गाठिंसाठी हवामान अनुकूल असते तेव्हा पाणी कमी द्या पण झाड पूर्ण वाळू नये याची काळजी घ्या.
  • नेहमी फक्त सकाळीच पाणी द्यावे.
  • अति खतही देऊ नका, खास करुन वाढ जेव्हा हळु होत असते.
  • जमिनीतील पालाश आणि कॅल्शियम पातळीवर लक्ष राहू द्यात, कारण ह्याच घटकांमुळे झाडांच्या पेशींची दाटी वाढते.
  • काही वाणे गाठींसाठी जास्त प्रतिकारक असु शकतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा